पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४

नाहीं. " ज्याप्रमाणे जर मधमाशी रागानें नांगी मारिते तर ती लवकर मरते'. "
 गिधाडाला अखाद्य मांसाशिवाय दुसऱ्या कशाचाही वास येत नाहीं असें ह्मणतात. चावणारा कांसव अंड्यांतून बाहेर पडल्यापूर्वीच चावतो आणि मेल्यावरही चावतो.
कांहीं लोक ह्या जगांत छिद्रान्वेषणाचें काम करण्यांत आयुष्य घालवितात. तथापि एखाद्या गोष्टीची वाखाणणी करणें हें टीका करण्यापेक्षां बरें व नुस्तें दोषांचें अवडंबर करणें ह्मणजे खरी टीका नव्हे. एखाद्या कपाटांत हाडांचा सांपळा असला तरी त्यांत दुसरें कांहीं तरी असेलच. ( एकाद्याच्या अंगीं कितीही मोठा दुर्गुण असला तरी त्याच्या बरोबर कांहीं सद्गुण असतीलच. ) माणसाचें शरीर नुसत्या हाडांचेंच नसतें. टीका योग्य असेल पण त्यांत तेवढेंच का सत्य आहे? स्टेजवर जाणें बरें, पण नाटक पाहाण्यास ती चांगली जागा नव्हे. माणसांत व आयुष्य- क्रमांत चांगलें शोधून काढण्याचा यत्न करा, वाईट शोधून काढण्याचा यत्न करूं नका, ह्मणजे तुझी जें शोधितां तें तुझांला मिळेल.
 शांत वृत्ति ठेवा. मुलें पिरपिर करूं लागलीं कीं दहांत नऊंना दुःख होत असतें ह्मणून तीं पिरपिरीं होतात; व पुरुष व स्त्रिया इतर गोष्टींप्रमाणे ह्या गोष्टींतही वाढलेल्या मुलांप्रमाणे होत. बऱ्याच गोष्टींत जर सर्व वस्तुस्थिति माहीत असली व त्यांच्या मनांत काय वागत आहे हे आपणांस कळलें तर बऱ्या- च तिरसट माणसांवर रागावण्याच्या ऐवज त्यांची आपणांस कींव येईल.


१ आलफ्रेड राजाचें विइयिअसचें भाषांतर.