पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १६ वा.


क्षमाशीलता.

 ज्याप्रमाणे लोकांनीं आपलें बरें करावें असें आपणांस वाटतें त्याप्रमाणे आपण त्यांचें करावें इतकेंच नव्हे, तर ज्याप्रमाणें त्यांच्या ठायीं तुमच्याबद्दल क्षमाबुद्धि वागावी असें तुह्माला वाटतें त्याप्रमाणे तुमच्या ठायीं त्याच्या बद्दल वागली पाहिजे. जर इतरांबद्दल तुझी मुळींच गय करीत नाहीं, तर त्यांनी आप- णाबद्दल करावी असें कसें इच्छावें? आणखी सारासारविचार केल्यास दुसऱ्यांच्या कृत्यांबद्दल मत देतांना तीं बऱ्या बुद्धीनें केलेली असावीत असे मानणें, दुसऱ्या पक्षापेक्षा अधिक चांगले दिसतें.
 ज्याप्रमाणे हॅनिबॉल आल्प्स पर्वतावर शिरका ओतून ओलांडून गेला असें ह्मणतात त्याप्रमाणें ह्या आयुष्यांतील संक- टांतून पार पडावें असें पुष्कळांस वाटतें. पुष्कळ माणसें स्वार्थ - त्याग करण्यास तयार असतात, परंतु ज्यांच्या योगानें आयुष्य सुखी व आनंदी होतें, अशा ममतेच्या व दयेच्या बऱ्याच गोष्टीं- कडे ते दुर्लक्ष्य करितात.
 जरी कुरकुर करण्यास प्रयोजन असले तरी घडलेला अपराध जितका मोठा आपणास वाटतो तितका मोठा तो नसतो, व त्या- बद्दल सूड उगविण्याच्या यत्नानें अधिकच बिघाड होतो. सूड उगविण्याच्या यत्नानें त्या अपराधापासून होणाऱ्या नुकसाना- पेक्षां जास्त नुकसान होतें. दुसऱ्याचें वाईट करण्याचा बेत केल्यामुळे स्वतःचें अधिक वाईट झालें नाहीं असें कधीं होत