पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२

 सॉक्रेटिसास जेव्हा शिक्षा झाली तेव्हां अपोलोडोरस त्याला अन्यायानें शिक्षा झाली ह्मणून रडूं लागला. तो तत्ववेत्ता ह्मणाला —“ तर मी अपराधी असायचें होतें असें तुला वाटते का ? "
 पिटर साधु ह्मणतो–“ ईश्वरावर भरवसा ठेवून अन्यायानें दिलेलें दुःख, संकटें, माणूस भोगतो हें स्तुत्य होय, कारण आप- ल्या अपराधांबद्दल त्रास झाल्यावर तो शांतपणे सोसण्यांत महत्व तें कोणतें ? पण जर बरें करून त्याबद्दल भोगावें लागतें, व तें तुह्मी संथपणें भोगतां तर तें ईश्वराकडे रुजू आहे.