पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०१

 “परंतु ईशान्येकडून बर्फीच्या वादळांतून सोसाट्यानें वहात येणारा, अंगास झोंबणारा वायु आमचीं ओक लांकडाचीं गलबतें पृथ्वीसभोंवतीं समुद्रांत नेतो; व आमच्या हृदयांत असलेलें व्हायकिंग लोकांचें पाणी जागृत करितो; आमच्या मेंदूस व स्ना- यूंस बळकटी आणितो; ईश्वरप्रेरित वायो, संथपणें वहा."
 आपलीं संकटें हा नैतिक गार वारा होय. त्यामुळे आपण बळकट होतों व अंगांत कुवत येते.
 " ख्यातीच्या भपकेदार पोषाखाला मागे टाकणारीं व नाय- काच्या शौर्याला भर आणणारीं, व त्याला मुकुटाप्रमाणें शोभवि- णारीं संकटेंच होत. हीं जर संकटें आलीं नाहींत तर एक लढाई जिंकायची राहिली व नायकाच्या मनोनिग्रहाला एक स्तुत्य जय मिळाला नाहीं. "
 एपिक्टेटस ह्मणतो—“ जर सिंह, अजगर, हरिण, रानडुकर, आणि ज्यांना हाकून टाकण्याचें व नाहींतशीं करण्याचें प्रयोजन आहे, अशीं पशुवत् वागणारी माणसें नसती तर हरक्यू- लिसची काय महती! असलीं मोठीं कृत्यें करावयाचीं नसती तर त्यानें काय केलें असतें ? पासोडी पांघरून तो निजला असता असें नव्हे का ? असल्या ऐषारामांत सुस्थतेंत लोळत पडला असता तर तो पहिल्यानें हरक्युलीस ह्या नांवानें प्रसिद्धीस आ- लाच नसता. यदाकदाचित् आला असता, तरी त्याचा काय उपयोग ? त्याच्या बाहुद्वयाचा, त्याच्या इतर अवयवांचा, त्याचा सोशिकपणा, त्याचें उदार मन, इत्यादींचा, जर असल्या गोष्टींनीं व प्रसंगांनी त्याला जागृत केलें नसतें किंवा आपलें बळ खर्चा- वयास लावलें नसतें, तर काय उपयोग झाला असतो ?”


१ टेलर.