पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००

जर आपणांस दुःख होतें आहे, तर तें आपल्या अपराधास्तव अथवा लोकांच्या कल्याणाकरितां.
 “ शहाणीं माणसें किती तोटा होणार ह्याचा विचार करीत बसत नाहींत, परंतु आपला तोटा भरून काढण्याचा मोठ्या आनंदानें यत्न करितातं. "
 आणखी, आयुष्यांतील असंख्य सुखें पूर्णपणें उपभोगावीं व त्यांबद्दल आभारी असावें हें खरें, पण दुःखें व संकटें ह्या नि- वळ वाईट गोष्टी आहेत असे मानूं नये. नेहमीं सारखें यश आलें तर कोणालाही बरें वाटणार नाहीं, त्यापासून त्रास झाला नाहीं तरी त्यामुळे हिंमत कमी होईल व उल्लास नाहींसा होईल. अडचणी नाहींशा करणें, मोहाचा प्रतीकार करणें, धैर्यानें दुःखें सोसणें, ह्याच्या योगानें, स्वभावाची उन्नति होते, तो दृढ होतो, आणि अंगीं औदार्य येतें.
 "अनंत विश्वाला तोंड द्यावयाचें पडलें ह्मणजे मोठ्या मानानें त्याकडे चालत जाणें ही एक मोठी गोष्ट आहे. "
 वसंतऋतूंतील चकचकीत सूर्यप्रकाश व मन्द हवा आपण मनापासून उपभोगितों, परंतु हिवाळ्यांतील बर्फ, व वादळें ह्या- मुळें सृष्टीला बरेंचरों सौंदर्य व मोठेपण येतें.
 किंग्स्ले एका सुंदर काव्यांत ईशान्येकडील थंड वायूचें चांगलें वर्णन करितो. " दक्षिण दिशेकडून वाहत येणारा सुख- कारक वारा कामुक जनांचे दुःखाचे सुस्कारे आपल्या कानांवर पाडितो. ह्या वेळीं रिकामटेकडे कामी जन रमणींच्या नेत्रसूर्याच्या तापामध्यें सुख मानीत असतात. माणसांची मनें व लेखण्या मात्र त्याच्या योगानें कोमल होतात. तिखट अंगाला झोंबणारी थंडीच शूर इंग्रज तयार करिते.


१ शेक्सपीयर. २ जीके.