पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९९

रूपी पाऊस पडूं लागला, तरी त्या निष्ठेमुळें पुनः आनन्दरूपी सूर्यप्रकाश मिळेलच. "
 "हिंवाळ्यानंतर उन्हाळा येतो. रात्रीनंतर दिवस येतो. मोठें वादळ झाल्यावर शांतता येते." आपला आयुष्यरूपी रस्ता जरी आंधारमय दिसला तरी कालामुळे मोठमोठालीं दुःखेही गिळतां येतात हें लक्ष्यांत ठेवा. “रात्रीं दुःखांचे ओझें झालें तरी दिवसा पुनः आनंद येतोच. "
 'हे दुःखी हृदया, शांत हो. शोक करूं नकोस. संकटरूपी अत्रापाठीमागें आनंदसूर्य झांकला आहे. सर्वांची स्थिति तुझ्या सारखीच आहे. प्रत्येक आयुष्यक्रमांत थोडा पाऊस पाहिजे; काही दिवस दुःखांत व अंधकारांत गेले पाहिजेत.
 कांहीं नवीन गोष्ट घडली, व पहिल्याने ती संकटाप्रमाणें वा- टली, तर ती तशी आहे अशी खात्री करून घ्या. नुस्त्या बाह्य स्व- रूपावरून वारंवार फसायला होतें. क्षुल्लक गोष्टींनीं आपला पा- डाव करावा व तो आपणांस खपावा अशा जगांत आह्मी रहात नाहीं. संकटें व दुःखें हीं पुष्कळ वेळां रूपांतर केलेल्या मित्रां- प्रमाणें असतात. जेव्हां परत फिरण्याकरितां दिलेली खूण नेल्स- नला पाहावयाची नव्हती, तेव्हां त्यानें आपल्या फुटक्या डोळ्या- चाही उपयोग करून घेतला. सर ब्रॅन्ड डफनें लिहिलेल्या रेननच्या सुरस चरित्रांत असें ह्यटलें आहे :- "जिवंत असतांना ज्यांच्या आयुष्यक्रमाबद्दल आपण मुळींच काळजी करीत नाहीं, पण ज्यांचें मरण आपणाला यावेंसें वाटतें असे लोक ह्या जगांत पुष्कळ आहेत. " व इतिहासांत देखील राज्यपद मिळाल्यामुळे जेवढे अमर झाले आहेत तेवढेच फांशीं दिल्यामुळे झाले आहेत.


१ ख्रिस्तानुकरण. २ शेक्सपीयर.