पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८


ती अस्पष्ट कळणारी पाहिजे. जेव्हां संकटाचा पुरा अदमास होतो, तेव्हां तें आपल्या अंगवळणीस पडतें, व बरीच भीति नाहींशी होते. " जुन्या दंतकथेंत सांगितलें आहे कीं, पिसें पाहून घाबरलेलें हरिण पारध्यांच्या हातांत सांपडलें व मेंढरांच्या कळपानें उडविलेल्या धुळीस शत्रू समजून छाप्यांत सांपडलें.
 शांतवृत्ति ठेवून धैर्य धरा. "संकटरूपी काट्यांतून पुष्परूपी बचाव करून घ्या." आणि प्राच्यांच्या म्हणीप्रमाणें “बचाव्या- च्या झग्याखालीं संतोषरूपी पाय झांकून घ्या. " फार मिळवि- ण्याची इच्छा धरूं नका. गएथी ह्मणतो- “थोडी इच्छा ठेवून पुष्कळ आनंद मानण्यास शिकणें हैं यशाचें गुप्त तत्व होय. "
 फार मिळावें व तें फार लवकर मिळावें अशी आशा करूं नका. ज्यांना धीर आहे त्यांना सर्व कांहीं मिळतें. आयुष्यांतील सर्वात मोठी संकटें जेव्हां माणूस आपल्या स्वतेजानें प्रकाशत असतो, तेव्हां त्याच्यावर येतात. तुझांला वाटेल तें करा, संकटें यावयाचींच, ह्मणून त्यांना धैर्यानें तोंड देणें हें आपलें काम आहे.
 " अगदीं दुःखाच्या वेळीं अतिशय सुखाच्या दिवसांची आठ- चण कर।" असें रिच्टर हाणतो.
 संकटे सोसूनही तीं सोसण्यास समर्थ रहाणें ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे तें लक्षांत ठेवा.
 “आणखी कांहीं होवो, दिवस कितीही कठिण असोत काल जातोचं" असें समजण्यांत नेहमीं समाधान आहे.

 कारण जॉर्ज मॅकडोनल ह्मणतो "जर आपले मन नीट कामां- वर आहे, व आपली निष्ठा जर दृढ आहे तर कामें अगदीं बिघ- डायचींच नाहींत. कारण जरी संकटरूपी धुकें आलें, व दुःख-


१ बर्क.