पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९७

सुख, क्षणिक सुखाकरितां वेंचितों. (हातांत सांपडलेला एक पक्षी चरा झाडावर असणारे दोन नको हें खरें आहे). हातचें सोडून पळत्याच्या पाठीस लागण्यास काय अर्थ ? पण त्या ठिकाणीं पळत हातीं लागणार नाहीं असा संभव असतो पण पुढलें आयु- प्य येणारच. “ज्यांचें सुख ह्मणजे मागील चांगल्या कृत्यांची आठवण व ज्यांची महत्वाकांक्षा ह्मणजे स्वर्गप्राप्ति ते खरे सुखी."
 "मनुष्याच्या अंगीं पहिल्यानें मर्दुमकी असली पाहिजे आणि काम करण्यास इच्छा व धाडस करण्यास छाती असली पाहिजे.
 कारण – "संशय हा फितुराप्रमाणे होय. तो यत्न कर ण्याची वानवा मनांत घालून जो फायदा बहुतकरून झाला अस- ता त्याला आपणांस मुकवितो. "
 धैर्य हा गुण आहे इतकेंच नव्हे, तर माणुसकीस अवश्य असणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. मनुष्य माणूस आहे असें ह्मण- ण्यास त्याच्या अंगीं धैर्य पाहिजे. ज्याप्रमाणें स्त्रीस स्त्री ह्मणण्यास तिच्या अंगीं मार्दव पाहिजे; तरी पुरुषाच्या अंगींही मार्दव हवें व स्त्रियांच्या अंगींही धैर्य हवें.
 परिणामाकडे दुर्लक्ष्य करणें हें धैर्य नव्हे. संकटांना तुच्छ मानणें ह्यांत धैर्य नाहीं, त्यांना तोंड देण्यांत धैर्य आहे. व्यर्थ धोक्यांत पडण्यांत धैर्य नाहीं. पण, संकट आलें ह्मणजे भित्रेप- णामुळें तें दुणावतें; ह्मणून धैर्यानें व शांतपणानें ह्यांना तोंड देणें हा बचावाचा खरा मार्ग. लढाईमध्यें शत्रूसमोरून पळून जाणें ह्मणजे मरणें होय. बहुतकरून अकिलीझसारखे लोकांना मागूनच फक्त भय असतें.
 बर्क ह्मणतो –“एकादी गोष्ट भयंकर वाटण्यास बहुतकरून


१ रस्किन. २ स्कॉट. ३ शेक्सपीयर.