पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६

दृढ आहेत, व त्यामुळे मी जें सोशितों आहे तें सर्व आशीर्वाद- स्वरूपी आहे अशी माझी बुद्धि, व आनंदवृत्ति ह्या नाहींशा झाल्या नाहींत."
 तर निराश होऊं नका. निराशेशिवाय दुसऱ्या सर्व गोष्टी परत मिळवितां येईल. “जो भितरा त्याचें नशीब फुटकें” असें सिराकचा पुत्र ह्मणाला.
 “धैर्य जर गळालें तर सर्व कांहीं गेलें.
 मग तूं जन्मासच आला नसतास तर ठीक झालें असतें, "
निमूटपणें सोसणें हें आपल्या दैवावर जय मिळविण्यासारखें आहे. “दुःखभरांत भलतें सलतें न करण्याची खबरदारी ठेवा, उद्यांपर्यंत जिवंत राहिलांत, तर अतिशय संकटाचा दिवसही नाहींसा होईल."
 चुक्या प्रत्येक माणूस करितो. जो चुकी करित नाहीं, त्याच्या हातून कांहीं होत नाहीं असें झटलें आहे तें बरोबर आहे. पण एक चुकी दोन वेळां करण्याची जरूर नाहीं. आपल्या चुक्या धड्यांसारख्या वाटाव्या, व उत्तमतर आयुष्यक्रमाला त्या पाय- ज्यांप्रमाणे व्हाव्या.
 जोसेफ ह्यूम ह्मणे – १०००० पौडांचें उत्पन्न असण्यापेक्षां आनंदी स्वभाव असणें मला बरें वाटतें.
 काम करतांना सध्याचा वेळ काय तो महत्वाचा. परंतु आयु- प्यक्रमामध्यें अशी एक स्थिति येते कीं, ज्या वेळीं पाठीमागें काय झालें किंवा पुढे काय होईल त्या धोरणानें वागावें लागतें. तात्का- लिक गोष्टींसाठीं आपण भावी आयुष्य खर्ची घालतों. ह्यामुळेंच आपलीं संसारांतील दुःखें उद्भवतात. ह्मणजे पुढील आयुष्यांतील


१ कूपर. २ गएथी.