पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९५

भीतीनें गांगरून गेल्यामुळे दाणादाण झाली आहे. पॅनिक ह्या शब्दाचा अर्थच निष्कारण भीति असा झाला आहे; व दिवसा- ढवळ्या देखील भीति व चिंता कारणाशिवाय आपणांस वारंवार ग्रासित नाहींत का ?
 “पुष्कळ संकटें अशी असतात, की त्यांचा आपण पुनः पुनः विचार केला नसता, व मोठ्या काळजीनें सांगोपन करून आप- ल्या हृदयांत त्यांना शाश्वत ठाव दिला नसता, तर तीं एकाद्या बुडबुड्याप्रमाणें नाहींतशीं झालीं असतीं, आणि विस्मृतिनदींत बुडून गेलीं असतीं.”
 "पुष्कळ दुःखें अशीं आहेत कीं तीं उद्यां नाहींतशीं होतील, मात्र त्यांना पंखें देण्यास (विसरण्यास) आपण तयार असलो पाहिजे. हीं दुःखें आगंतुकाप्रमाणें मनांत वास्तव्य करितात, मन.. खट्टू करितात; व आपणांस न समजतां त्यांची अंडीं उत्पन्न हो- तात व त्यांतून सर्व प्रकारच्या क्लेशकारक भयंकर वस्तु जन्मास येतातं.”
 असंतुष्ट माणसानें स्वतःला असें विचारावें की "कोणा एका माणसाची स्थिती आपणांस हवी आहे ?" एका माणसाचें आरो- ग्य, दुसऱ्याची संपत्ति, तिसऱ्याची संतति मिळण्याची त्याला इच्छा करितां येत नाहीं. आपणाला जर आपली स्थिति आवडत नाहीं तर दुसऱ्या कोणा एकाची स्थिति एक तर सर्वस्वी घ्यावी नाहीतर मुळींच घेऊं नये.
 कॉलेरिजवर जेव्हां मोठी संकटें आलीं तेव्हां त्यानें सर हम्फ्रे डेव्हीला असें लिहिलें: – “ह्या घडामोडींत, ह्या अपमानाच्या व भीतीच्या वेळीं, ईश्वराच्या अनादित्वाबद्दलचे विचार माझ्या मनांत


१ क्लार्क.