पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४


 सिडनी स्मिथच्या अंगचा विनोद व व्यावहारिक ज्ञान ह्यांनीं भरलेला असा त्यानें एक उपदेश केला आहे. तो हाः -
“खरें मर्दुमकीचें काम ह्या जगांत करणें असेल, तर कार्यरूपी नदीच्या कांठीं कुडकुडत, किंवा थंडी वाजेल व बुडूं ह्याचा विचार करीत उभे रहातां कामा नये. तर आंत एकदम उडी मारावी व कसेंही करून पलीकडच्या तीरास जावें." खऱ्या संकटास लोक घाबरत नाहींत हें चमत्कारिक आहे; काल्पनिक संकटास लोक अधिक भितात. लोकांत आपला उपहास होईल ह्याला लोक मूर्खासारखे घाबरतात.
 भलत्या सलत्या गोष्टींत लाज धरूं नका. पिटरनें फॅरासीस च त्याचे शिपाई ह्यांना मोठ्या धैर्यानें तोंड दिलें, परंतु मुख्य धर्माधिकाऱ्याच्या दिवाणखान्यांतील मोलकरणी व मुली ह्यांचें हंसणें त्याला सोसलें नाहीं.
 “मरण येण्यापूर्वी भित्र्या लोकांना मरणव्यथा हजारदां होऊन जाते. शूरांना मरणव्यथा एक वेळ होते.” "
 तबेल्याच्या खिडिकीतून हात बांधला गेल्यामुळे लोंबकळत असलेल्या डॉन क्विक्सटला एक भयंकर खंदक खालीं आहे असें वाटे. परंतु मॅरिटोरनीसनें जेव्हां दोरी कापिली तेव्हां जमिनी- पासून थोड्या इंचांच्या अंतरावर आपण लोंबत होतों असें त्याला कळलें. " आत्म्याच्या उन्नती " मध्यें मिस्ट्रस्ट व टिमरस ( भितरे लोक ) ह्यांना ज्या सिंहाची भीति वाटली, ते सिंह साखळदंडांनीं बांधिले आहेत असें ख्रिश्चन जेव्हां धैर्यानें पुढें गेला तेव्हां त्याला कळलें.
 लढाईमध्यें ज्यांनीं जय मिळविले अशा किती सैन्याची रात्रीं


१ शेक्सपीयर. २ पिल्ग्रिम्स प्रोग्रेस.