पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १५.


आशा.

 श्रद्धा व दान, ह्या गुणांसारखा आशा हा गुण मानिला आहे ह्याबद्दल आश्चर्य प्रदर्शित केलेलें मीं बऱ्याच वेळां ऐकलें आहे. श्रद्धेचा अर्थ लोक बरोबर करोत अथवा चुकीचा करोत, दानबुद्ध हा गुण आहे हें उघड होय. पण आशा हा गुण कां मानावा ?
 तथापि निराश होणें हें चुकीचें आहे. जर निराश होणें चुकीचें आहे तर आशा बाळगणें योग्य होय. सोसकपणा व कार्याचे ठायीं एकनिष्ठता हे गुण अंगी असणें ह्मणजे आशा असणें होय. एकाच शौर्याच्या कृत्यावरून मग तें कितीही परोपका- राचें असो- माणसाच्या स्वभावाची पारख करण्याच्या ऐवजीं, सोसकपणा ही पारख करण्याची सहाण समजणें अधिक बरें. पतिप्रेम एकनिष्ठपणें बाळगणाऱ्या तरी अत्यंत क्लेश सोसणाऱ्या बायका खऱ्या सती.
 गोष्टी मनास लावून घेऊ नका. हताश झाल्याशिवाय मनुष्य खरोखरी हरला असें होत नाहीं.

 “आकस्मिक गोष्टीला हार जाण्यांत लाज नाहीं. तसेंच नुसत्या मनगटाच्या जोराला हार जाण्यांत नाहीं. त्याच्या योगानें माणसाचें कांहीं वाईट होत नाहीं. पण पाठ दाखवून पौबारा करणें, व स्वसंरक्षणाकरितां हात उचलल्याशिवाय हार जाणें, अथवा हल्ला केला ह्मणून हरलों ह्मणणें ह्यांत खरी लाज होय. माणसाच्या दैवावर अवलंबून नाहीं, ही त्याची चुकी होय. "


 १ बटलर.
 १७