पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२

व सर्व सामर्थ्य खर्चून भक्ति ठेव, ही पहिली आज्ञा. व दुसरीही पहिलीसारखीच आहे- ह्मणजे स्वतः प्रमाणें आपल्या शेजाऱ्यांवर प्रीति कर. ह्यापेक्षां जास्त महत्वाची दुसरी आज्ञा नाहीं. आणि तो यहुदीह्मणाला, माझ्या धन्या, त्वां खरें सांगितलें. कारण ईश्वर एकच; त्याशिवाय दुसरा नाहींच. त्याच्यावर मनापासून आपल्या समजुतीप्रमाणे, आपला आत्मा अर्पून सामर्थ्यानुरूप भक्ति ठेवणें व स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांवर प्रीति करणें, ह्या गोष्टी यज्ञयागापेक्षां जास्त आहेत. व त्यानें योग्य उत्तर केलें असें पाहून येशू ह्मणाला देवाच्या राज्यापासून तूं फारसा दूर नाहींस.”