पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

आपल्या हिताच्या मानून त्या मिळविण्याकरितां बिनदिक्कत झटतात, व अशा रीतीनें आपल्याला व आपल्या बरोबर इतर लोकांना दुःखार्णवांत टाकितात असें केवळ नाहीं, तर पुष्कळ चांगलीं माणसें व चांगलीं पुस्तकें, चांगल्या इराद्यानें ह्यांत तिळप्राय संशय नाहीं — बहुतेक असलीच चुकी करितात. त्यांनी पापाचरणांत घालविलेलें आयुष्य ह्मणजे सुखाचें, सद्गुण ह्मणजे आत्मनाश, व देहदंडन ह्मणजे धर्म असें लिहिलें आहे. इन्क्वीझिशन हें असल्याच प्रकारचें तत्व विकोपास गेल्याचें उदाहरण होय. इन्कीझिशनमधील बरेच लोक फार चांगले होते. ते स्वभावानें फार दयालु, व क्षमाशील होते ह्यांत संशय नाहीं. मात्र ख्रिस्ती धर्माचें खरें तत्व समजण्यांत त्यांची चुकी झाली होती. जगांत सुखकारक ह्मणून जेवढें तेवढें धर्मदृष्टया वाईट असलें पाहिजे. धर्माची खरी वृत्ति माणसाचा स्वभाव तिरसट, तुसडा, व दुर्मुखलेला करिते. त्याचप्रमाणें ही तेजोमय सूर्यकिरणांनी प्रकाशित, आपल्याला वेष्टून असणारी सृष्टि अपकारकारक वस्तु आहे, व त्यांत सुख मुळींच नाहीं. ती माणसास वारंवार मोह व्हावा ह्मणून पापरूपी सैतानानें उत्पन्न केलेली आहे. शुभस्वरूपी ईश्व- रानें आपणांवर ज्या सुखकारक वस्तूंचा वर्षाव केला आहे त्यांपैकीं ही नव्हे. असें ह्मणणारीं चांगलीं शहाणीं सुर्ती माणसें नेहमींच्या परिचयांतलीं आहेत. कूपरनें ह्याचेंच सुंदर कवितेंत वर्णन केलें आहे. तें असें :- “ जेथें दुःख मुळींच नाहीं अशा लोकाप्रत नेणारा मार्ग दुःखानें परिपूर्ण आहे, व तोच तेवढा मार्ग होय."

 दुःख पाहिल्याशिवाय आपलें आयुष्य जाईल असें कधीं होणार नाहीं हें खरें आहे. जेथें प्रकाश आहे तेथें सांवली असलीच पाहिजे. आयुष्याच्या मर्यादितपणामुळे आपल्या आवडीचीं माणसें परलोकवासी झालीं, ह्मणजे आपणांवर जीं दुःखें ओढवतात