पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

लिहितो— "सद्गुणांस असली बक्षिसें नेहमीं मिळतात. ह्मणून तुला मोठें व सद्गुणी व्हावयाचें असेल तर असल्या शुद्धवर्तनी लोकांचा कित्ता घ्यावास सुखी होण्यास हाच एक रस्ता आहे."

डेकार्टनें व्यवहाराबद्दलचे सर्व नियम चार वचनांत आणिले आहेत. वचन पहिलें — ज्या देशांत व ज्या धर्मांत आपण जन्मास आलों त्या देशाच्या व त्या धर्माच्या कायद्याप्रमाणें वागावें. दुसरें — कृति करण्याची वेळ आली ह्मणजे आपल्या अल्प बुद्धी- प्रमाणें चटकन् काम करावें व मनास फारशी हुरहुर लावून न घेतां काय निष्पन्न होतें तें पहावें. तिसरें — आपल्या इच्छा मर्यादित करण्यांत सुख मानावें, त्या तृप्त करण्यांत सुख मानूं नये. चवथें — सत्याचा शोध करणें हेंच आपल्या जन्माचें सार्थक मानावें.

 लिली आपल्या इफ्यूस नांवाच्या पुस्तकांत आपला उपदेश थोडक्यांत अशा रीतीनें सांगतो. (हें पुस्तक एकदां फार लोकप्रिय होतें.) “सूर्यास्तीं निजावें, कोंबड्याच्या आरावाबरोबर उठावें, नेहमीं आनंदी व विनयशील असावें, गांभीर्य अंगीं ठेवावें, पण दुर्मुखलेलें नसावें. अंगीं शौर्य असावें, पण साहसांत पडूं नये. पोषाख चांगला करावा. पथ्यकर अन्न खावें. पण फाजील खाऊं नये. ज्याच्या योगानें खरोखर करमणूक होईल अशा गोष्टी कराव्या. वेळ खरोखर मनोरंजनांत घालवावा. कारणाशिवाय कोणाबद्दल संशय घेऊ नये, पण पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेऊ नये. प्रत्येकाचें मत घेण्याएवढें आपलें मन हलकें नसावें. तरी पण आपलेंच खरें इतकें हट्टी असूं नये. ईश्वराची सेवा करावी. ईश्वराची भीति बाळगावी. त्याच्यावर प्रीति करावी. ह्मणजे तुमच्या इच्छेनुरूप व तुमच्या मित्रांच्या इच्छेनुरूप तो तुह्मांला आशीर्वाद देईल."

 विचारशून्य, आपलपोटे, आणि दुष्ट असेच लोक कांही गोष्टी