पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९१

हें आपणाला कळते; ज्या ठिकाणीं वाढत्या प्रमाणानें ज्ञान मिळण्या- च्या ऐवजी एकदम मिळालें असतां आपली बुद्धी भ्रमली असती, अथवा अनंत विश्व एकदम स्पष्ट दिसूं लागतांच आपली बुद्धी थकून गेली असती, अशा ठिकाणीं ईश्वरानें मोठ्या ममतेनें अंध- काराचें पटल आमच्या पुढें ठेविलें आहे, हें पाहून आह्मांला आनंद वाटतो."
 “ख्रिस्ती धर्माचा जो चांगला भाग ह्मणून आपण मानितों त्याविषयीं मनांत विचार केला तर मानवी प्राण्यांच्या इतिहासांत तो धर्मचालक होऊन गेला ह्या बाबतींत ख्रिस्ती धर्माचें महत्व कोणी कमी मानणार नाहीं. तो चांगला भाग कोणता ह्मणाल तर, सामर्थ्य, शांति, न्यायप्रियता, मनुष्याच्या चंचल स्वभावाबद्दल क्षमा, प्राण देखील खर्ची घालण्यापुरती परोपकारबुद्धि, नैतिक उन्नति व शुद्धता इत्यादि गुणांनीं पूर्ण असा श्रेष्ठतम माणूस त्या धर्मानें आपल्या डोळ्यांपुढें मांडिला . ह्या सर्व गोष्टींचें प्रेषितांनीं वर्णन केलें आहे. ह्यांवर धर्मासाठीं प्राण वेंचणाऱ्या शेंकडों लोकांनी पूर्ण विश्वास ठेविला. व त्यामुळे, सेना येथील कॅथरिन किंवा जॉन नॉक्स ह्यांसारख्या गरीब कुळांत उत्पन्न झालेल्या माणसांच्या अंगीं मोठमोठे राजे व पोप ह्यांना दोष देण्याचें धैर्य आलें" असें प्रो० हक्स्ले ह्मणतो.

 सेंट मार्क अशी गोष्ट सांगतो कीं, लेखकांपैकीं एक येशू- जवळ आला व ईश्वराची मोठी आज्ञा कोणती असें त्यानें विचारलें, तेव्हां येशूनें उत्तर दिलें “हे यहुद्या, ऐक, सर्वांत मोठी आज्ञा ही होय:- : - आपला मालक जो देव तो एक होय, व त्याच्यावर मनापासून, त्याच्या ठायीं आत्मा लीन करून


 १ रस्कीन.