पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०

परोपकारास अनुलक्षून होय. श्रद्धेमुळें एबेलनें यज्ञ केले, तीमु- ळेंच नोव्हानें जहाज तयार केलें, तीवरून एब्राहामनें घर सोडिलें. ज्यावर त्यांचा विश्वास होता, अथवा जें कांहीं त्यांनी केलें त्यांबद्दल पुरेशीं कारणें त्या सर्वांस होतीं; निदान कारणें आहेत असें त्यांना वाटलें होतें इतकें तरी प्रत्येक कबूल करील. क्लेशाचें व दगदगीचें काम आपल्यापुढें येऊन ठेपलें आहे असें पाहून त्यांनी माघार घेतली नाहीं; व जें त्यांना वाजवी दिसलें तें इमानानें बजावलें ह्मणून त्यांची वाहवा झाली. पुरावा चांगलासा नसला तर मत न देणें हें एक कर्तव्य होय. व तें सोप्यांतलें नव्हे. पुष्कळ ठिकाणीं आपलें खास मत न देणें हा गुण जरी नाहीं तरी कर्तव्य असतें.
 आह्मी ज्या पद्धति काढितों त्या कांहीं वेळ टिकतात, व त्यांचें आयुष्य भरलें ह्मणजे नाहींतशा होतात.
 आमचें ज्ञान ह्मणजे ईश्वरी ज्ञानाचा तुटकसा भाग होय. व हे परमेश्वरा, तूं सर्वांहीपेक्षां जास्त आहेस.
 हें अंधकाराचें पटल हळूहळू सरत आहे, परंतु असंख्य प्रश्नांविषयीं अज्ञान राहणार व त्यांतच सध्या संतोष मानला पाहिजे.
 "आपणां मानवी प्राण्यांचें सुख, तुटपुंजें ज्ञान जें मिळतें आहे, तें घेऊन संतुष्ट रहाण्यांत आहे. मग तें ज्ञान स्वतःसंबंधी देखील कां होईना. XXXXXX तमोमय पटलांत जिवंत रहा- ण्यास व हालचाल करण्यास समर्थ आहोंत ह्या गोष्टींवर सर्व आनंद, व कामकाज नेटाने करण्याची सर्व उमेद अवलंबून आहे. हें पटल एका जागीं सुटतें दुसऱ्या जागीं पुनः सांधतें ह्यां आपलें समाधान आहे; व पातळ पापुद्र्यांतून शाश्वत व स्थिर वस्तूंविषयीं जें ओझरतें ज्ञान होतें त्यांतच आपला आनंद आहे. हें ज्ञान आपल्यापासून दूर ठेवण्यांत ईश्वराचें औदार्यच आहे