पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८९

जर एखादें फूल किंवा दगड ह्याचें देखील बरोबर वर्णन आप- णांस करितां येत नाहीं, तर अनादि अनंत जो ईश्वर त्याला ओळखणें भाषेस शक्य नाहीं अशी आपली खात्री असली पाहिजे. अथवा त्या वेळच्या विचारांप्रमाणें जुन्या ग्रंथकारांनी जीं कार्यै वातदोषापासून होतात, तीं पिशाचबाधेपासून होतात असें जर लिहिलें असलें तर त्यांत आश्चर्य नाहीं.
 ज्याचे आपणांस कांहीं कारण सांगतां येत नाहीं, किंवा जें आपणांस समजत नाहीं, तें खरें मानण्यांत कांहीं शहाणपण नाहीं. ज्या गोष्टीबद्दल पुरासा पुरावा नाहीं ती गोष्ट खरी मान- ण्यांत, अथवा जें आपणांस कळत नाहीं तें आपणांस कळतें असें समजण्यांत, शहाणपण नसलें पाहिजे. खरोखर ज्याच्या ब- द्दल चांगलासा पुरावा नाहीं असें आपणांस कळतें तें खरें मा- नणें अशक्य आहे. उलटपक्षीं, ज्याबद्दल पुरावा आहे तें खरें मानणें व ज्याबद्दल पुरावा नाहीं त्याबद्दलचें मत न देणें हें आपले कर्तव्य आहे. पुष्कळांना असें वाटतें कीं, प्रत्येक विचार खरा मानिला पाहिजे किंवा खोटा तरी मानिला पाहिजे. तथापि बहुतेक ठिकाणीं खरा ह्मणण्यास किंवा खोटा ह्मणण्यास आप- गांजवळ पुरावा नसतो.
 खरी श्रद्धा हा कांहीं बुद्धीचा संस्कार नव्हे. आपणाला जो धर्म लावून दिला आहे तो जागृतावस्थेत आहे. धर्मामुळे हातून काम होत नाहीं तर तो धर्म मृत होय. सेल्डन श्रद्धा व परोपकाराचीं कृत्ये ह्यांची प्रकाश व उष्णता ह्यांच्या बरोबर तुलना करितो. “माझ्या मनांत जरी तीं पृथक् पृथक् मानिलीं, तथापि ज्याप्रमाणें मेणबत्तीत प्रकाश आणि उष्णता दोन्हीं असतात तरी मेणबत्ती मालविली ह्मणजे दोन्ही नाहींतशी होतात." हिब्रू लोकांचें उत्त- मतम जें प्रकरण त्यांत श्रद्धेविषयीं जें कांहीं झटलें आहे तें