पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८

ण्याच्या ऐवजीं माणसापुढें, खरें, सचोटीचें व शुद्ध वर्तनक्र- माचें अनुकरणीय उदाहरण माडून देत असावें; त्या ठिकाणीं संसारांतील चिंतेच्या ओझ्याने त्रासलेल्या लोकांस उन्नततर वर्तनक्रमाबद्दल स्वस्थचित्तें विचार करण्यास अवकाश सांप- डावा ( हा उन्नतर वर्तनक्रम थोड्यांसच साधतो, तरी तो सर्वांस साधण्याजोगा असतो ); जीवनकलहांत व धंदेरोज- गांरांत गुंतलेल्या माणसांस आपण ज्या फायद्यांकरितां इतके परिश्रम करितों ते फायदे, मनाची शांति व दानधर्म, ह्यांच्या मानानें किती क्षुद्र आहेत असें समजण्यास वेळ सांप- डावा. मी खात्रीपूर्वक सांगतों कीं, असा जर धर्म स्थापित झाला तर तो मोडून टाकण्यास कोणी खटपट करणार नाहीं. "
 ही धर्माची कल्पना आर्नल्ड, मॉरिस, किंग्सले, स्टॅन्ले, जॉ- वेट इ० धर्माधिकाऱ्यांच्या धर्मकल्पेनेपासून फारशी भिन्न नाहीं. इंग्लंडांतला राजानुशासित धर्म हळूहळू ह्याच उच्चस्थिती येऊन पोंचत आहे. जसजशी त्याची तशी स्थिती होईल तस- तसा तो बळावत जाईल.
 धर्ममीमांसक जी भाषा लोकांस कळेल अशा भाषेच्या द्वारे आपले विचार प्रदर्शित करितात; व त्याचा शब्दशः अर्थ आपणांस घेतां येईल असें समजणें अन्यायाचें होईल. जेव्हां कवि सूर्य उगवतो असें ह्मणतात, तेव्हां ज्योतिषशास्त्राचा ते अव्हेर करितात असा दोष त्यांच्या माथीं मारितां येणार नाहीं. अथवा पृथ्वी फिरते सूर्य फिरत नाहीं, असें जर कोणी प्रतिपादन करूं लागला, तर तो शेक्सपीयरची अथवा टेनिस - नची अवहेलना करितो असें बोलणें न्याय्य होणार नाहीं. शास्त्रांतील नवीन शोध होऊ लागले ह्मणजे नवीन भाषा दे- खील काढावी लागते. व नवीन तयार केलेल्या शब्दांशिवाय