पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८७

पडते तितकें शास्त्रज्ञान धर्मांत नाहीं. शास्त्रवेत्ते जे धर्मावर वि- श्वास ठेवित नाहींत ते धर्माची अवहेलना करण्याच्या बुद्धीनें ठेवित नाहींत असें नव्हे. पूज्यबुद्धिप्रदर्शकच त्यांचा नास्तिकपणा अ- सतो; त्यांत तिरस्कारबुद्धि नसते. टेनिसनने ह्याचें नीट रीतीनें वर्णन केलें आहेः – “कोणता पंथ स्वीकारावा ह्याबद्दल त्यांचा अनिश्चितपणा होता; पण त्याचें वर्तन शुद्ध होतें, व शेवटी त्यानें आपल्या हृदयांत जो कवितारस भरला होता तो बाहेर ओतला. मी खरेंच सांगतों कीं, नास्तिकपणा प्रांजलपणें कबूल करण्यांत जी पूज्यबुद्धि दिसते त्यांतली निम्मे पूज्यबुद्धि कोणत्याही पं- थांत नाहीं."
 उदाहरणार्थ दोन मासलेवाईक माणसें घेऊ या. प्रोफेसर तिंडल ह्मणतो—“ह्या विश्वांत जी अतुल शक्ति व्यक्त झालेली दिसते, तिला इंद्रियगोचर असें नियमित स्वरूप देऊं लागलों, मग तें आपल्या शरीरासारखें असो किंवा दुसरें कसेंही असो, ती शक्ति माझ्या हातून निसटते, व मानवी बुद्धिसामर्थ्यानें तिचे घटकावयव किंवा गुणावगुण निश्चित होत नाहींत. तिला उद्दे- शून “तो” असा पुल्लिंगवाचक शब्द वापरतां येत नाहीं, तिला "मन" अशा विशिष्ट नांवानें हांक मारितां येत नाहीं, तिला कार्याचें कारण असें ह्मणणें मला कबूल नाहीं, अशा रीतीनें ह्या गूढानें मी दंग होऊन गेलों आहें" प्रोफेसर हक्स्ले आमच्या उत्तम तत्वज्ञान्यांपैकीं, एक होय. तो अज्ञेयवादी होता, नेहमींच्या अर्थाच्या धर्मसंस्था त्याला बिल- कूल पसंत नाहींत. पण त्यानेंही सांगितलें आहे – “ज्याच्या योगानें मनुष्यसमाजाचें कल्याण होईल अशा प्रकारचा ठरीव धर्म असावा असें मानितां येतें. त्या धर्मांतील देवळांत प्रत्येक आठवड्यास ईश्वरमीमांसेंतील नुस्त्या मतांबद्दल पुनरुक्ति कर-