पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६

निर्माण झालें, त्या आदिशक्तीच्या डोळ्याखालीं माणूस सतत असतो, हें निश्चितच आहे."
 अतएव मनांत ज्या भावना होतात, ह्यांतच आनंद मानिला पाहिजे. आपणांस मनांतल्या भावनांच्या व्याख्या बांधितां येत नाहींत.
 ज्या मतभेदामुळे माणसांचे निरनिराळे पंथ होतात ते धर्माचे भाग नव्हत, ते हट्टवाद होत. पॉल साधूच्या उक्तीकडे दुर्लक्ष्य करून माणसें हट्टानें बोलतात, “मी पॉल पंथाचा, मी आपोलास पंथाचा इ०. "
 जेरेमी टेलर ह्मणतोः – “प्रभूचें राज्य ह्मणजे नुस्तीं बायब- लचीं वाक्यें सांगतां आलीं ह्मणजे येतें असें नव्हे; तर सात्विक वर्तनापासून उत्पन्न होणाऱ्या बळामुळे प्रभूचें साम्राज्य होतें. तरी सध्यां आह्मीं नवीनच तऱ्हा स्वीकारिली आहे. सर्व धर्म ह्मणजे नेमक्या गोष्टींवर विश्वास, व विश्वास ह्मणजे लोकांना अभिरुचि लावून देणें अथवा वितंडवाद करावयास लावणें होय. धर्म, ह्मणजे एका पक्षास चिकटून रहाणें व इतर जगाबरोबर भांडणें होय. आपला धर्म कोणता असें विचारल्यास, आपण कोणत्या पंथाचे आहोंत, ह्मणजे आपल्या पंथाचीं काय तत्वें आहेत, असा अर्थ घेतों. आपण आयुष्य कसें घालवितों हा घेत नाहीं. व लोक अमुक पंथाचे कट्टे भक्त असले, आणि त्याच्या ब- यची त्यांना आस्था असली कीं, ते फार दुर्मिळ मानिले जा- तात; मग ते (डॅथन ) यमधर्माप्रमाणें लोभी असोत, किंवा नारदासारखे कळलावे असोत, (भ्रष्ट देवदूत) चार्वाकासारखे धर्मलंड असोत, किंवा परशुरामासारखे उन्मत्त असोत, चालतें.
 शास्त्रवेत्ते लोक धर्मलंड असतात असा वारंवार आक्षेप येतो; तरी थारो ह्मणतो, वस्तुतः शास्त्रज्ञानांत जितकी धर्मबुद्धि सां-