पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८५

कंटाळा आला. तूं जो माझा मार्गदर्शक, सत्यस्वरूपी, माझ्या संसाराचें अंतिम तत्व, ज्याविषयींच्या ममतेमुळे माझ्या साध्या हृदयास ऊत येतो, त्या तुझ्याकडे, मनांत प्रेरणा उत्पन्न झाल्या- मुळें, तुझ्या संगतींत रहाण्याकरितां, व मेल्यानंतर तुझ्यांत लीन होण्याकरितां, मी धांव घेतों."
 मार्टिनो ह्मणतोः–“जे माझ्यापुढें ईश्वराबद्दल पाल्हाळ लावि - तात, व त्याचे हेतु व त्यानें ठरविलेल्या कल्पना पूर्णपणें अव- गत आहेत अशा रीतीनें जे बोलतात, प्रत्येक रचनेचें कारण अ- थवा प्रत्येक गोष्टींत व्यक्त झालेली ईश्वरी दया, सांगण्यास जे एका पायावर तयार असतात, विश्वांत चाललेली नेहमींची काट- कसर व त्यांत दिसणारा शहाणपणा जे वानितात, वकिली श- क्कलीचें उत्तम उदाहरण ह्मणून जे त्याची स्तुती करितात, ईश्व- रानें उत्पन्न केलेल्या पवित्र वनस्थलींतून फिरत असतां, एकाद्या बंद्या गुलामाप्रमाणें डौलानें चार पावलें टाकितात, तीं माणसें, त्यांच्या निश्चितपणामुळे, व खात्रीलायक कल्पनांनी मला वेडावून टाकितात; मला नास्तिकपणाच्या वेदना होतात, व त्यांच्या कानीं कपाळी ओरडावें लागतें-कमी मागत असला तरी मी सर्व द्यायला तयार आहें. (तुह्मी सांगाल तें कबूल करावयास तयार आहें.)"
 डी स्टॅनले आपल्या आयुष्याचें सार्थक्य पुढे लिहिलेलें होतें असें ह्मणतो: “जगांतला आस्तिकपणा व नास्तिकपणा ह्यामध्यें चालणारें जें झुंज, तें मोडून टाकणें, व ज्या पर्वता - चरून देव आपणाला मदत पाठविणार त्या पर्वतावर आपली ए- काग्रता करण्याचा थोडा तरी यत्न करणें."
 हर्बर्ट स्पेन्सर ह्मणतो- “ज्या गूढांचा विचार करूं लागलों ह्मणजे तीं अधिकाधिक गूढ वाटू लागतात, अशीं गूढें ह्या जगांत आहेत; तरी ज्या अनंत आणि शाश्वत आदि शक्तीपासून हें जग