पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४

आहे. हा अफाट समुद्र आपली मति गुंग करून टाकितो, व मोठेपणामुळे, आणि अस्पष्टपणामुळे आपल्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देतो. आणि हें गुह्य विशेष गूढ वाटतें तें असें- ह्या जगांतलें आपलें जीवित अनंत आकाशसमुद्रांत बेटाप्रमाणें आहे, इतकेंच नाहीं तर ह्या अनादि अनंत कालसमुद्रांत देखील लहान बेटाप्रमाणें आहे. "
 परंतु, वारंवार आपणांला अज्ञानांत राहावें लागतें किंवा आपलें मत जरा खोळंबून ठेवावें लागतें, ह्मणून आशा सोडतां कामानये.
 “आणि ह्मणून आह्मी ह्मणतों कीं, दुस्तर्क्स जो परलोक, मग तेथें अरुणोदयासारखा ज्ञानप्रकाश असो, किंवा संध्येसारखा अस्पष्ट प्रकाश असो, किंवा भर दोनप्रहरांसारखा उज्ज्वळ असो, अथवा तेथें रात्रीसारखें अज्ञान असो, तेथें ज्या लहान समग्र वस्त्राचें आपलें जीवित एक सूत्र आहे असें जें आपणास आपो- आप कळतें - तें सूत्र तुटणार नाहीं, तर तें तेथें पुनः सांधून त्याचें एक सबंध वस्त्र विणून तयार होईल. "
 जें आपणांस मनांत वाटतें त्यापैकीं बरेंच आपणांस शब्दांनी प्रदर्शित करितां येत नाहीं. हैं फक्त ज्ञानकांडालाच लागून नाहीं. सेंट ऑगस्टाईन ह्मणेः — “काल ह्मणजे काय असें जर मला विचाराल तर मला सांगतां येत नाहीं. तुझी मला विचारू नका. पण मला तो कळतो."
 वेस्ली आपल्याविषयीं वर्णन करितो:-

 “ह्या वाक्कलहाचा मला कंटाळा आला. हे विचार, हे सं- स्कारउपचार, हे रीतिरिवाज, हीं निरर्थक नांवें ह्यांचा मला


 १ धर्मैक्यता.