पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८३

त्सवाचा सुंदर देखावा तुमच्या समोर दाखवीत आहे. जी शक्ति तुह्माला दिसत नाहीं, जिला स्पर्श करितां येत नाहीं, अथवा जिची व्याख्या करितां येत नाहीं, जिचें माप क- रितां येत नाहीं, जी उमगत नाहीं, अशा त्या गूढ ईश्वरी श- क्तीचें अस्तित्व व कार्ये ह्यांचीं द्योतकें सभोंवार दृष्टीस पडतात. ह्या शक्तीला वाणी नाहीं, तिचा आवाज होत नाहीं, ती दिसत नाहीं, तरी तींत चैतन्य आहे; वर दिसणाऱ्या प्रत्येक फांदींत, पायाजवळ जमिनीवर उगवणाऱ्या प्रत्येक गवताच्या पातींत तें चैतन्य दिसतें. "
 संशय खरोखर सर्व तत्वज्ञानाचा पाया होय. आह्मी गूढांनीं भरलेल्या जगांत रहातों. व साधें पुष्प कसें व्हावें, व एकादा अति क्षुद्र जंतु कसा निर्माण व्हावा हें आह्मांला सांगता येत नाहीं; मग अनंत स्वरूपी जो ईश्वर तो आह्माला कसा उमगावा ? डॉ. मार्टिनो ह्मणतोः–“आकाश व निःशब्दत्व हे आपण ईश्वराचे गुण मानितों, संध्याकाळीं दंव पडूं लागलें, ह्मणजे जणूं काय त्यामुळे दिवसाची चिंतारूपी धूळ दडपून जाते, व अगदीं बारीकसारीक चिंतेमुळे डोक्यास विशेष त्रास झालेला असतो, त्याच्या ऐवजीं विस्तृत ध्यान सुरू होतें; तारकागणांनी अंकित झालेल्या अनंत आकाशाखालीं ही धरणी एकाद्या वाळवंटाप्र- माणें निद्रित दिसते. अवर्णनीय ईश्वरी अस्तित्वाची भावना आ- मांला गुंग करून टाकिते. रात्रीं वारा सोसाट्यानें वाहत असतां, दचकून आह्माला त्याच्या सांनिध्याची आठवण होते; आकाशाचे जे फार प्राचीन दीप त्यांच्या प्रकाशांतून तो आमच्याकडे नीट टवकारून पाहत आहेसें वाटतें. "
 जॉन स्टुअर्ट मिल ह्मणतो: “मानवी जीवित हें गूढांनीं व्याप्त आहे. आपला अनुभव हा अफाट समुद्रांतील बेटाप्रमाणें