पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

आयुष्य ह्मणजे परार्थाला वाहिलेलें कडकडीत व्रतच होय." इ० इ० नवीन मतें उत्पन्न झालीं आहेत.

 “सतत श्रम करून अपमानकारक व कुणबटास योग्य असा धनगराचा धंदा पत्करण्यांत, व दुःसाध्य सरस्वतीचें वायफळ ध्यान करण्यांत काय फायदा ? ज्याप्रमाणें शृङ्गारी लोक गर्द छायेमध्यें अमरिलिसबरोबर क्रीडा करितात, अथवा नीरेच्या केशपाशाशीं खेळत असतात त्याप्रमाणें केलेलें बरें नाहीं काये ? "

 पण खरी गोष्ट ह्याच्या उलट आहे. दुर्गुणाला बन्धनाशिवाय व मर्यादेशिवाय राहण्याचा हक्क आहे हें खोटें आहे; इतकेंच नव्हे तर दुर्गुणी माणसांना अगदीं दुष्ट अशा धन्याच्या ह्मणजे स्वतःच्या मनोविकारांच्या बंदेगुलामीत असावें लागतें.

 आणखी कांहीं तरुणांना वाटतें कीं, छंदांत पडणें ह्यांत मर्दपणा आहे. पण कोणत्याही गयाळ मूर्खाला दुर्गुणी होतां येतें. मात्र सद्गुणी होण्यास अंगांत मर्दुमकी हवी. सद्गुणी होणें ह्मणजे सर्व बन्धनांतून मुक्त होणें होय. दुर्गुण ही खरी गुलामी. अमुक एक वर्तनक्रम वाईट ह्मणून आपला अपकर्ष होतो असें नव्हे. तर त्यापासून अपकर्ष होतो ह्मणून तो वाईट. नीतीच्या तत्वांमध्यें जर एकादा विलक्षण फेर झाला व वाईट तें चांगलें ठरलें तर त्यापासून मनाची शांतता नष्ट होईल.

 पाप आणि दुःख हीं एकमेकांशी कार्यकारणभावानें चिकटलेलीं असतात, ही प्रतिज्ञा सिद्ध करून दाखविण्याकरितां एकाद्या वेदांत्याचें वार्तिक आणित नाहीं. असल्या मुद्याबद्दल लॉर्ड चेस्टरफील्डसारख्या व्यवहारांत कसलेल्या माणसाच्या पुराव्यावर माझी जास्त भिस्त आहे. तो आपल्या मुलास पाठविलेल्या पत्रांत उपदेशाच्या आणखी कांहीं गोष्टी बोलल्यावर शेवटीं असें


१ मिल्टन .