पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७९

आरंभी अशक्य वाटलें, शुद्ध ह्मारकीप्रमाणें वाटू लागलें, तरी तुह्मांला पहिल्यानें पाहिजे तेंच तें असेल; पर्वतावरील शुद्ध हवे- प्रमाणें तुमच्या सद्वर्तनाला बळकटी आणणारें तें असेल. आपले स्कॅन्देनेव्हियामधले पूर्वज घण धारण करणाऱ्या थॉरला पूजित असत. नार्स भाषेंतल्या एका कथेंतही व्हॉलन्डनें उत्तम लोहार बनण्याकरितां आपला आत्मा सैतानाला विकला असे सांगतात. येथें कदाचित् व्हॉलंद थोडासा बहकला.
 निजेस किती वेळ द्यावा हा खरोखर मोठा प्रश्नच आहे. प्र. त्येकाच्या शरीरप्रकृतीला मानेल तसें ठरविलें पाहिजे. कांहीं लोकांना इतरांपेक्षा जास्त नीज हवी असते. प्रकृतीला हवी अ सते, ती कमी करणें अशक्य आहे; व गाढ निद्रेत घालविलेला वेळ फुकट गेला असें ह्मणतां येत नाहीं. नीज मोठ्या आश्चर्यका- रक रीतीनें स्नायूंना पुनः कुवत आणिते. व ही कुवत शहरांत रहाणाऱ्या लोकांच्या अंगांत फारच थोडी असते. सर ई कोकनें दिवसाचे असे भाग केले होते:-
 “सहा तास निजेंत घालवा, कायद्याच्या गहन अभ्यासांत सहा घालवा, देवकार्यास चार लावा. बाकीचे सृष्टिसौंदर्याचा अभ्यास करण्याकडे लावा."
 सर डब्ल्यू. जोन्सनें त्यावर पुढील सुधारणा केली:-“ सहा तास कायद्याकडे लावा, मन ताजेतवानें करणाऱ्या निजेसाठीं सात खर्चा, व्यवहाराकडे दहा तास लावा; व इतकें करूनही सर्व तास कृष्णार्पण करा. सहा सात तास माझ्या निजेला पुरे होणार नाहींत. इतकी नीज घ्यावी कीं, तिच्या योगानें कामकाज कर- ण्यापुरती अंगांत पुनः हुशारी येईल, व शरीर ईर्षेशिवाय रहाणार नाहीं.” दुःखाच्या वेळीं ज्या व्यवसायाच्या योगानें, आपल्या