पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८

व मला मोठा माणूस कर असें सांगूं लागला. तेव्हां बिशप - णाला-“भाऊ तुझा नांगर मोडला असल्यास नीट करण्याला पैसे लागतील ते देतों, तुझे बैल मेले असले तर दुसरे विकत घेऊन देतों; पण मला तुला मोठें करितां येत नाहीं. तूं माझ्या मतें नुस्ता धनगर ठरलास; तूं धनगरच रहाणार."
 मिल्टनला बुद्धिकुशाग्रता होती इतकेंच नव्हे, तर त्याचा उ- द्योगही अजिंक्य होता. तो आपल्या संवयींबद्दल असें लिहितो. “हिंवाळ्यामध्यें माणसास काम करण्यास किंवा प्रार्थना करण्यास जागृत करणारी कोणत्याही देवळांतली घांट होण्यापूर्वी मी उठें. उन्हाळ्यांत, जे पक्षी लवकर उठतात, त्यांच्या बरोबर अथवा अंमळ त्यांच्या नंतर मी उठें व मन जागृत होईपर्यंत किंवा स्मरणशक्तीला सोसे इतकें ज्ञान मिळेपर्यंत मी चांगल्या चांगल्या ग्रंथकारांचे ग्रंथ वाचीत असें, किंवा कोणाला वाचायला सांगत असें. नतंर निवांतपणीं व मोठ्या प्रमाणानें शारीरिक श्रम करून शरी- राचें आरोग्य व धडधाकटपणा राखीं; अशाकरितां कीं आपला देश व धर्म ह्यांच्या साठीं काम करण्यांत शरीरानें मनाला सतत एकसारखी फारशी दगदग न पडतां मदत करावी."
 आपले काम ह्मणजे ज्यांत गोडी नाहीं असें एक कर्तव्य असें मानूं नका; वाटल्यास तें गोड करून घेतां येईल. सर्व मन ला- तें त्याची महती (अर्थ) काय ती समजावून घ्या. त्याची कारणें व पूर्वीचा इतिहास शोधून काढा. सर्व दृष्टींनी त्याचा विचार करा. आपल्या अल्पस्वल्प श्रमाचा कितीजणांस उपयोग होईल त्याचा विचार करा, व ज्या कर्तव्यास ह्मणजे आपलें तन मन धन अर्पण करितां येत नाहीं असें कर्तव्यच ब- हुधा सांपडावयाचें नाहीं. तुह्मांला आपले काम आवडूं लागेल व आनंदानें काम करूं लागलांत ह्मणजे तें सोपें वाटेल. तें जरी