पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०

विचारांचा ओघ बदलतो, त्यांपासून बरेंच समाधान वाटतें. “ह्या संसारांतलें सुख ह्मणजे कांहीं काम करावयास असणें, प्रीतीची वस्तु असणें, व भावी आशा असणें हें होय." खरोखर बरेच लोक फुरसुतीच्या वेळीं, रिकामी काळजी वाहून, किंवा फुकाच्या चिंता लावून घेऊन, स्वतःला यातना देतात. नेहमीं मन गुंतवून ठेवा.
 "ह्मणजे दुःखांमुळें जी शांति मिळणें अशक्य असते ती कामकाजांत आणि विचारांत तुह्मांला सांपडेले."
 सातारा लिली ह्मणतो- "शहाण्या माणसाला जो देश त्यानें पाहिला तो स्वतःच्या देशाप्रमाणें वाटतो, व शांत माणसाल कोणतीही जागा राजवाड्याप्रमाणें वाटते."

 तरी पण, सृष्टिक्रमाला अनुसरून उद्योग करीत असा; त्याच्या विरुद्ध जाऊं नका. होता होईल तों प्रवाहाविरुद्ध गलबत चाल- विण्यास लागूं नका. पण तसें करावेंच लागलें तर करा; मग मात्र माघार घेऊं नका. पण, आपण सृष्टिनियमांस पुरेसा वेळ दिला, तर ते आपल्यासाठीं काम करितात. “ज्याप्रमाणें सृ- ष्टीच्या पलीकडील ईश्वरी नियमास लागून कांहीं वर्तनक्रम आहेत, त्याप्रमाणेंच सृष्टिनियमांसही लागून कांहीं आहेत. ह्म-णून जो सृष्टीचा एक नियम मोडतो त्याच्या माथीं सर्व नियम मोडल्याचें दूषण येतें. जणूं सर्व सृष्टि त्याच्या बरोबर लढण्यास तयार होते; व दृश्य व अदृश्य अशीं दोन्हीं सैन्यें बरोबर घेऊन त्याबद्दल त्याचें पारिपत्य करण्यास ती तयार होते. आणि त्याच्या मागून त्याच्या मुलाचें पारिपत्य करण्यास तयार होते. मग तें पारिपत्य ती केव्हां करते, कोणत्या ठिकाणीं करिते तें त्याला कळत नाहीं. उलटपक्षी अगदी मनापासून सृष्टिनिय-


 १ डॉ० चालमर्स. २ स्टलिंग,