पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७७

 फ्रँक्लीन ह्मणे-“जे कर्तव्य आहे तें करण्याचा निश्चय करा. व जें करण्याचें ठरविलें असेल तें कराच करा."
 बुद्धिकुशाग्रता मेहनतीच्या ऐवजीं उपयोगी पडते असें कधीं कधीं लोक समजतात. ज्यांनीं कॉलेजमध्ये असतांना पहिलीं वर्षे खेळण्यांत घालविलीं, व शेवटला थोडा वेळ शेंडीला दोरी बां- धून सडकून अभ्यास केला, व मोठ्या मानानें परीक्षा पास झाले, अशा लोकांचे वृत्तांत आपण वाचतों. परंतु पक्के समजा, शेंडीला दोरी बांधून अभ्यास केल्याबद्दल त्यांना जब्बर प्रायश्चित्त भो- गावें लागलें. तें कसेंही असो पण त्यांना शेवटीं मेहनत करावी लागलीच. बऱ्याच मोठमोठे लोकांस हुशारीपेक्षां उद्योगामुळें यश आलें आहे असें, त्यांच्या शाळेतल्या अभ्यासक्रमावरून ठरविल्यास, ह्मणावें लागेल. वेलिंग्टन, नेपोलियन, क्लाईव्ह, स्कॉट, शेरिडन, हे शाळेत असतांना निर्बुद्ध होते असें ह्मणतात. कांहीं माणसांस इतरांपेक्षा जास्त बुद्धि असते हें खरें आहे. प रंतु दोघां माणसांस एके वेळीं ह्या संसारांत शिरूं द्या. एकाच्या अंगीं तीव्रबुद्धि असून आळस, निष्काळजी, मनसोक्त वर्तन असूं द्या, व दुसऱ्याचे अंगीं मंदपणा असून, उद्योग, काळजी व सत्यानुरूपं वर्तन असूं द्या. तो दुसरा मनुष्य कांहीं वेळानें आपल्या अधिक हुशार प्रतिस्पर्ध्याला मागे टाकील. सारांश पाहूं गेलों असतां, नुस्ता उद्योगी माणूस, मग तो बुद्धिवान् का नसेना, बुद्धि- वान् उद्योगास कंटाळणाऱ्या माणसांपेक्षा जास्त काम करील. उद्योग व सद्वर्तन ह्या दोन गोष्टींची उणीव, आयुष्यांतील फाय- द्याच्या गोष्टी, हुशारी, श्रीमंत व बलाढ्य मित्र आणि पुरस्कर्ते ह्यांच्या योगानें भरून निघणार नाहीं.
 ग्रॉसेटस्ट हा लंडन शहराचा बिशप व मोठा मुत्सद्दी होता. त्याला एक आळशी भाऊ होता. तो एकदां त्याच्या जवळ आला