पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६

तिचें, जॅमेसम बाईनें लिहिलेल्या चरित्रांत उतारा दिलेल्या लॉर्ड मॉन्टीगलसमोर प्रदर्शित केलेल्या उद्गारांवरून, दिग्दर्शन होतें.
 “कांहीं कामास्तव आपणांस निरुपायानें तसदी द्यावी लागते" अशा अर्थाचे कांहीं उद्गार जेव्हां लार्ड मॉन्टीगलनें काढिले, तेव्हां त्या क्षणाल्या " तसदी हा शब्द माझ्या पुढें उच्चारूं नका. ए- कादी गोष्ट कशी करावयाची व ती चांगल्या रीतीनें कशी क- रितां येईल, तें मला सांगा मात्र, ह्मणजे मला करितां आल्यास मी ती करीन."
 तर मग ह्या जगांत तुमचा कोणताही धंदा असो व कोण- तेंही कर्तव्य असो, तें जेवढें चांगलें करितां येईल तेवढें कर- ण्याचा यत्न करा. ड्यूक ऑफ् वेलिंग्टनला जे जय मिळाले ते तो मोठा दक्ष सेनानायक होता ह्मणून मिळाले, तसेंच तो का- मकाजांत दक्ष होता ह्मणून मिळाले. दाणागोटा व बाजार- बुणग्यांची व्यवस्था ह्यांबद्दलच्या बारीकसारीक गोष्टींकडे तो बारकाईने लक्ष देई. त्याच्या घोड्यांना दाणा वगैरे पुरेसा असे, त्याच्या शिपायांना गरम कपडे, चांगले बांधलेले जोडे, व चां- गलें अन्न असे.
 सॉलोमन ह्मणतो: “आपल्या कामकाजांत दक्ष असा म- नुष्य तुझ्या माहितीतला असल्यास तो खरोखर कधीं तरी राज- सन्मानास पात्र ठरेल. " व सेंट पॉल देखिल आझांला असेंच सांगतो - "कामकाजांत आळस करूं नका. मनांत भक्ति ठेवा, आणि ईश्वराची सेवा करा."
 उद्योग नेहमीं फळ देतोच; हिंदुस्थानास पश्चिमेकडून जा- ण्याचा रस्ता शोधतांना कोलंबसास अमेरिका सांपडली. आपल्या बापाचीं गाढवें शोधतांना सॉलला राज्य मिळालें, असें गयेथी सांगितलें आहे.