पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७५

व अनोळखी प्रदेशांतून प्रवास करणाऱ्या लोकांकरितांच 'ससा आणि कांसव' ही गोष्ट सांगितलेली दिसते.”
 लवकर उठा; स्नायूंस व मेंदूला पुरेसा व्यायाम व विश्रांति मिळू द्या; खाण्यापिण्यांत बेताबातानें वागा; पुरेशी झोप घ्या; म- नाला गोष्टी लागणार नाहींत अशी खबरदारी ठेवा; मग कामापासून तुह्मांला कोणतीही इजा होणार नाहीं, अशी खात्री आहे. दगदग, संताप, अधीरता, आतुरता यांच्या योगानें काम जास्त जलद होणार नाहीं, व त्यामुळे कदाचित् अंतीं तुह्मांला मरण येईल; नाहींतर एकाद्या रोगाच्या भक्ष्यस्थानीं पडावें ला- गेल. परंतु ह्या संसारांत आनंदवृत्तीनें रहाल, मन शांत ठेवाल, तर मेंदूचें काम व मोकळ्या मनानें विचार करणें, ह्या दोन गोष्टी, ज्याप्रमाणें, शरीराला व्यायाम व मोकळी हवा, त्याप्रमाणें, मनाला होतील; त्यांच्या योगानें तुमचें आयुष्य कमी न होतां उलटें वाढेल.
 सततची मेहनत माणसाचा स्वाभिमान जागृत ठेविते. कसें बसें काम संपविणें ह्मणजे, गंजलेलें चिलखत जुन्या चालीरी- तीचें स्मारक ह्मणून नव्हे, तर फक्त त्यांचा उपहास करण्याकरितां गून ठेवण्याप्रमाणे आहे.

 “अविश्रांत श्रम हेंच मुत्सद्यांचें डोकें, हीच वीरांची समशेर, शोधकांचें इंगित, व विद्वान् लोकांचा विद्यादेवीचीं लाविलेलीं कवाडें उघडणारा मंत्रे." आमच्या परमपूज्य कैलासवासी महा- राणी इतिहासांत आलेल्या राजांमध्यें उत्तम गणल्या जातात. व त्याचें कारण काय ? त्यांना सारासार विचार होता, अक्कल होती, हें खरें; पण त्याचें मुख्य कारण ह्मणजे कितीहि श्रम असोत ते करण्याचें त्यांनी नाकारलें नव्हतें. ज्या बुद्धीनें त्यांनीं श्रम केले


 १ शेक्सपीयर. २ प्लेन लिव्हिंग अंड हाय थिंकिंग.