पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७४

नका. अविचाराच्या एका कृत्याबद्दल देखील सर्व आयुष्याचें प्रायश्चित्त पुरें होत नाहीं."
 विश्रांति घेऊं नका; आयुष्य क्षणिक आहे. मृत्यु येण्यापूर्वी दोन हात दाखवा; कांहीं तरी मोठें व वैभवाचें काम काळास जिंकण्याकरितां ( आपलें स्मरण रहावें ह्मणून ) मागें ठेवा. हा नाशवंत देह नाहींसा झाल्यावर ह्या जगांत ( आपलें स्मरण ) रहाणें वैभवकारक आहे'.
 काम करा, पण घाईनें करूं नका, किंवा फारसा बभ्रा करूं नका व त्याच्याबद्दल फिकिरींत राहूं नका.

 फ्रांसिस गॅल्टन ह्मणतो “आपला प्रवास किती झाला ह्या- बद्दलच चौकशी ठेवा, पण प्रवासाचा शेवट केव्हां होतो त्याबद्दल आतुर होऊं नका. सुधारलेल्या राष्ट्रांत परत आलों ह्मणजे आपल्या दुगदगीचा शेवट झाला, व संकटांतून मुक्त होण्यास आसऱ्याचें ठिकाण मिळालें, असें मानण्याच्या ऐवजीं त्यांत आपणांस थोडें वाईट वाटलें पाहिजे; व एक सुखाचा, साहसी आयुष्यक्रम संपला असें मनांत वागलें पाहिजे. ह्या रीतीनें जीव कमी धोक्यांत घालून तुह्मी तेव्हांच पुढें जाल, वाटेंत तुझांला जागोजागी ओळख क- रून ठेवतां येईल; देशाचें सामर्थ्य कितपत आहे हें तुह्मांला कळेल, व त्यामुळे जर घाईघाईनें परतावें लागलें किंवा पळ काढावा लागला तर अमोल उपयोग होईल. ह्या रीतीनें कांहीं महिने गेल्यावर केंवढें अंतर आपण तोडलें हें पाहून तुमचें तु- ह्मांला आश्चर्य वाटेल. तुझीं रोज सरासरी तीन मैल चालण्याचा क्रम ठेविला, तर वर्षाच्या शेवटीं १००० मैल चालून जाल. ह्मणजे तुमच्या हातून बराच भाग शोधल्याचें होईल. अफाट


 १ गयेथी.