पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७३

 कांहीं व्यवसाय नसतां विश्रांति मिळणें कठिण असतें.
 कधीं घाई करूं नका. सृष्टिनियमांत घाई नसते. नवशिक्या पर्वतांवर चढणाऱ्या माणसाला स्विस वाटाड्या पहिली सूचना ही देतो व तीच तो पुनः पुनः सांगतो: माणसाने हळू पण नेटानें चढावें, जलद चालूं नये अथवा रेंगाळतही जाऊं नये. मधून मधून विश्रांती घ्यावी, कारण मस्त पोळाला देखिल विश्रांति ह- वीच; व ज्याला आपण फर्लांग ह्मणतों त्याचा अर्थ जेवढी जमीन नांगरल्यावर बैलाला विश्रांति हवी तेवढी जागा होय. परंतु सं- सारांत देखील नावारूपास येण्यास अधीर न होणें व फुकट वेळ न दवडणें हाच मोठा नियम होय. अधीरता सैतानानें उत्पन्न केली, पण सहनशीलता सुखाचें द्वार उघडणारी आहे. घाई करून वेळ वांचवितां येतो, असें पुष्कळ लोकांना वाटतेंसें दिसतें, पण ही मोठी चुकी आहे; चपळाईनें काम करणें हें बरें, पण एकादी गोष्ट नीट रीतीनें करणें हें, ती लवकर संपवून टाकण्यापेक्षां अधिक महत्वाचें आहे.
 तशांत कामाविषयीं ह्मणाल तर तें आज केलें उद्यां नाहीं असें घाईघाईनें कटाळवाणें व अधिक मेहनतीचें होतें. अनियमितपणानें ह्मणजे केलें, तर तें अधिक तसें हळूहळू एकसारखें व नियमितपणानें घाई केल्याशिवाय काम केलें ह्मणजे होत नाहीं. घाई केली ह्मणजे काम खराब होते इतकेंच नव्हे, तर आयुष्य फुकट जातें.
 घाई केल्याशिवाय काम करा, व अविरत काम करा हा एथीचा नियम होता.
 "घाई करूं नका, अविचाराच्या कृत्यानें मनाच्या तरतरीला मंदावून घेऊं नका. नीट विचार करा. खरें तें निवडून काढा व नंतर नेटानें पुढें चला व आपलें सामर्थ्य ओळखा. घाई करूं