पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२

मुळींच मनांत आणित नाहींत. स्वावलंबन व आत्मसंयमन हे गुण स्वतःवर अवलंबून रहाण्यास, निढळच्या घामानें रोटी मिळ- विण्यास, आपली पोटगी कशी मिळवावी हैं कळण्यास, श्रम करण्यास, व आपल्या जवळ वापरण्यासाठीं दिलेल्या वस्तूंचा मोठ्या काळजीनें उपयोग करण्यास शिकवितील."
 प्राग्देशीयाची एक ह्मण आहे, "चांगल्या श्रमाचें सार्थक होतें. कामाची टाळाटाळी करणाऱ्या सिंहापेक्षां मेहनत करणारा कुत्रा बरा."
 सृष्टिदेवता माणसास ह्मणते- “प्रत्येक तासास काम करीत अस मग पैसा मिळो वा न मिळो. काम करण्याची खबरदारी ठेव, ह्मणजे त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय रहात नाहीं. तुझें काम नाजूक असो किंवा काबाडकष्टाचें असो, धान्य पेरण्याचें असो अ- थवा महाकाव्य लिहिण्याचें असो, तें प्रामाणिकपणानें केलें व आपल्या खात्रीचें उतरलें ह्मणजे त्यापासून आपल्या इंद्रियांना व मनाला सुख होतें. त्यांत किती वेळां जरी अपयश आलें, तरी यश येणें हें मनुष्यजातीस साहजिक आहे. चांगल्या रीतीनें बजा- वलेल्या गोष्टीचें बक्षिस ह्मणजे ती बनावणें हेंच होय. "
 सर वॉल्टर स्कॉटनें आपणास सांगितलें आहे की मोठा जादूगीर जो मायकेल स्कॉट, त्याला आपल्या तैनातींत असलेल्या भूतांच्या त्रासांतून फक्त सतत उद्योगांत मग्न होऊनच सुटतां येतें, असें आढळून आलें. हीच गोष्ट आह्मांला लागू आहे. माणसाच्या श- रीरांतून हांकून लाविलेलें सैतानाचें वारें जेव्हां देहरूपी गृह मोकळें सांपडलें, तेव्हां आणखी सात पिशाचांसहवर्तमान शिरलें.

 आळस ही विश्रांति नव्हे. कामापेक्षां त्यामुळे जास्त त्रास होतो. रोमन लोकांची एक ह्मण होती-


 १ एमर्सन.