पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७१

पाहरेकऱ्याचा बिछाना, ही माझी वाचण्याची जागा. माझी प- डशी माझें पुस्तकाचें कपाट. माझ्या मांडीवर घेतलेला एकादा लांकडाचा तुकडा माझें लिहिण्याचें टेबल. आणि त्या कामाला माझ्या आयुष्यापैकीं एक वर्ष लागलें नाहीं. मेणबत्त्या व तेल विकत घेण्यास मजजवळ पैसा नव्हता.हिंवाळ्याच्या दिवसांत संध्याकाळीं मला उजेड क्वचित् सांपडे; शेगटीचा उजेड सांपडे, पण तो देखिल माझ्या पाळीच्या वेळीं; शाई, पेनें, कागद इ० वस्तु घेण्यांत जो पैसा मी खर्ची तो तुह्मी क्षुल्लक मानूं नका. तो पैसा मला मोठ्या दौलतीप्रमाणे होता. मी आतां आहें तितकाच उंच होतों, माझी शरीरप्रकृति चांगली होती, व मी व्यायाम पुष्कळ करीत असें. बाजाराचा खर्च करण्यास जो पैसा सरत नसे तो प्रत्येकीं आठवड्यास दोन पेन्स पडे. मला पक्के आठवतें, एकदां अगदी जरूरीचा खर्च केल्यावर एका शुक्रवारी मी अर्धा पेन्स मोठ्या कष्टानें राखून ठेविला; व त्याचे लालहेरिंग मासे उद्यां घ्यावयाचे असें ठरविलें. रात्रीं जेव्हां कपडे काढिले तेव्हां मला इतकी भूक लागली होती कीं, मला जीव नकोसा झाला होता; अशा वेळी माझा अर्धा पेन्स हरवला असें मला कळलें.
 " त्या घाणेरड्या पासोडीमध्यें व घोंगडीमध्यें मीं डोकें खुपसलें व एकाद्या पोरासारखा रडलों. तेव्हां मी पुनः पुनः सांगतों कीं इतक्या अडचणींतून मी ह्या कठीण कामास तोंड दिलें व तें तडीस नेलें; तर काम तडीस गेलें नाहीं त्याबद्दल सबबी सांगणारा तरुण मनुष्य ह्या जगांत आहे काय किंवा असेल तरी काय ?"
 कॉबेटजवळ पैसा नव्हता पण धैर्य व हिंमत होती. बेकन ह्मणतो- “पुष्कळ लोकांना आपली शक्ति किंवा आपली संपत्ति बरोबर उमगत नसते. पैशापासून वाजवीपेक्षां फाजील फायदा होण्याची लोक आशा करितात. व शक्तीपासून होणारा फायदा