पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०

 कांहीं तरी काम करा, मग तें कोणतेंही असो. परिस शोधून काढण्याच्या व वर्तुळाचा चतुष्कोण करण्याच्या श्रमापासूनही कांहीं निष्पन्न झालें आहे.
 डॉ० जान्सन् ह्मणतो- “वाणी पृथ्वीची मुलगी व कृत्ये हे स्व- र्गाचे मुलगे. तुह्मी जें कांहीं कराल तें पूर्ण मेहनतीनें करा. त्यांत तुमचें मन असू द्या. तुमच्या सर्व शक्ती संशोधित करा. एक तर त्याचा उपयोग करा नाहीं तर त्या हरविण्यास तयार व्हा. झेझिकियाबद्दल सांगतात कीं आरंभलेल्या कार्यात तो मन घाली, आणि ह्मणून त्याला यश येई .”
 “बुद्धिकुशाग्रतेबद्दल बोलायचें ह्मणजे, संकटांना न जुमा- नतां एकसारखा यत्न करणे इतकेंच कायतें बोलतां येईल. बुद्धि- कुशाग्रता अंगीं असलेलीं नामांकित माणसें देखिल असें आप- णांस खात्रीपूर्वक सांगतात कीं, बुद्धिकुशाग्रता ह्मणजे अव्याहत श्रमापेक्षां निराळी चीज नव्हे. जॉर्ज इलियटसारखी बाई प्रेरणेनें आपली पुस्तकें आपण लिहिलीं ह्या कल्पनेला हंसते. येल येथील मुलांस प्रेसिडंट ड्वाईट सांगत असे कीं, बुद्धिकुशाग्रता ह्मणजे यत्न करण्याची शक्ति."
 भिक्षा मागणें हैं, काम करण्यापेक्षां अधिक गहन आहे. व एकूण पाहिलें तर कामानें जेवढे पैसे मिळतात तेवढे त्यांत पैसेही मिळत नाहींत. तशांत प्रत्येकानें आपल्या श्रमावर अवलंबून रहाण्यास शिकावें. फ्रॅन्कलिन ह्मणे स्वतः काम करणारा एकादा कुणबी लोकांच्या विनवण्या करणाऱ्या श्रीमंत गृहस्थापेक्षां बरा.

 कॉर्बेट आपल्या प्रसिद्ध इंग्रजी व्याकरणाविषयीं बोलतांना असें सांगतो - "रोज सहा पेन्स पगारावर शिपायाचें काम करीत असतां मी व्याकरण शिकलों. माझ्या खाटेची कडा, अथवा


  १ क्रॉनिकल्स. २ गार्नेट.