पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १३.


उद्योग.

 कोणतीही गोष्ट व्यर्थ घालवू नका. कांहीं करा पण वेळ फुकट दवडूं नका. आजचा दिवस एकदांच येतो. पुनः येत नाहीं, वेळ ही देवाची अमोल देणगी आहे. ती एकदां गेली ह्मणजे पुनः येत नाहीं.
 देवाला देखील गेल्या काळावर सत्ता चालवितां येत नाहीं. कारण जें झालें तें झालें. आणि गेला संधि येऊन गेली.
 पुढें पश्चात्ताप करावा लागेल अशा रीतीनें सध्यां वेळ दवडूं नका. "फार वेळ झाला" किंवा "असें झालें असतें तर बरें झालें असतें,” ह्या विचारांपेक्षां जास्त दुःखकारक दुसरे विचार नाहींत. वेळ हा ठेवीसारखा आहे, व मिनटामिनिटाचा तुह्मांला हिशेब द्यावा लागेल. “नीज थोडी घ्या, अन्न थोडें खाव व सर्वोत विशेष वेळाची काटकसर फार करा. "
 नेलसन एकदां ह्मणाला - "मला जें यश येत गेलें त्याचें कारण ह्मणजे कार्यवेळेपूर्वी अर्धा तास तयार असणें हें होय."
 लार्ड मेल्बोर्न ह्मणतो- “ तरुणाच्या कानीं ह्याशिवाय दुसरे शब्द पडूं नयेत; ह्या जगांत योग्यतेस चढणें तुमचें काम आहे; व अन्न मिळणें किंवा न मिळणें स्वतःच्या श्रमावर अवलंबून असतें.”

 आणखी यश येण्यास उद्योग जरूर आहे इतकेंच नाहीं, तर त्यामुळे नैतिकवर्तनावर चांगला संस्कार उत्पन्न होतो.


 १ ड्रायडन.