पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८

 जेरेमी टेलर हाणतो- “आळशी होऊं नका. फुरसुतीचा प्रत्येक भाग उपयोगी व एकाग्रता करणाऱ्या कामांत घालवा. का- रण आत्मा व्यवसायमग्न नसतो व शरीर स्वस्थ असतें तेव्हां काम- विकार होतो. रिकामटेकड्या, धष्टपुष्ट व स्वस्थचित्ताच्या माणसाला मोहपाश पडल्यास शुद्ध रहातां येणार नाहीं. पण सर्व व्यवसा- यांपेक्षां शारारिक श्रम मनांतलें सैतानाचें वारें काढून टाकण्यास अतिशय उपयोगी व फायदेशीर आहेत. "
 “पृथ्वी व वेळ ह्रीं स्वर्गप्राप्तीचीं व शाश्वतीचीं साधनें होत. ज्याप्रकारें क्षणाक्षणाचा आपण उपयोग करितों त्याप्रकारें देव आपल्या पुढील युगांचा उपयोग करील." असें केबलचें म्हणणें आहे. इतरांस अधिक सुखी व आनंदी करण्यास थोडा तरी हात- भार लावणें ही मनुष्याच्या मनांत स्फुरण पावणाऱ्या वासनांपैकीं व आशांपैकी उच्चतम व मनाला उदात्त करणारी वासना व आशा.
 बर्फाचा पुतळा बनविण्यास पीट्रो मेडीचीनें एकदां मायकेल ॲन्जेलोला नेमिलें होतें. हा मौल्यवान् वेळाचा दुरुपयोग होय. पण जसा मायकेल अॅन्जेलोचा वेळ मौल्यवान् होता तसा आपला वेळ आपल्याला आहे; तरी बर्फाचे पुतळे करण्यासारख्या अथवा त्याहून वाईट शेणमातीच्या मूर्ती करण्यासारख्या क्षुल्लक कामांत आपण आपला वेळ घालवितों.
 रोमन लोकांचा मोठा तत्ववेत्ता व मुत्सद्दी सेनेका झणतो- "वेळ थोडा आहे अशी आपण नेहमीं कुरकूर करितों तरी उप- योग कसा करावा हें आपणास कळत नाहीं इतका वेळ आपणांस असतो. मुळींच काम न करण्यांत, अथवा अप्रासंगिक गोष्टी कर- ण्यांत, किंवा जें कर्तव्य आहे तें न करण्यांत, आपलें सर्व आयुष्य जातें. दिवस थोडे राहिले अशी आपण नेहमीं बडबड करितों. पण जणूं काय दिवस अनंत आहेत असें आपलें वर्तन असतें. "