पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६

 मुलांस प्रेमरूपी सूर्यप्रकाशांत वाढवा. लहानपणीं जर प्रकृति उल्हासित करणारें दृढप्रेम मिळण्यापुर्ते त्याचें नशीब असले, तर त्यांना ह्या जगांतलें दुःख अधिक चांगल्या रीतीनें सहन क- रितां येईल.

 प्रेमसांठ्याची खूण जीं प्रियकर मुलें त्यांच्याबरोबर बोबड्या शब्दांनी बोलतेवेळी मन रंजविणाऱ्या किती बोलांनीं हृदय उचंबळूं लागतें, हें जो मनुष्य आपल्या मुलांवर प्रीति करितो त्यालाच सांगतां येईल. ज्यांना मुलांच्या संगतींत बरें वाटतें त्यांच्या मनांत, तो पोरकटपणा, तें अडखळत बोलणें, त्यांचा थोडा वेळ रहाणारा राग, त्यांचें अज्ञान, त्यांचीं व्यंगें त्यांच्या जरूरी, इत्यादि गोष्टी आनंद व सुख ह्यांचे अंकुर उत्पन्न करितात. पण ज्याचें आपल्या बायकोवर व मुलांवर प्रेम नाहीं, तो घरांत सिंहीण पोसतो व दुःखाचीं अंडी उबवितो. ईश्वरप्रसाद त्याला सुखकारक होत नाहीं. अतएव आपल्या बायकोवर प्रीति करा अशी जी ईश्वराची आज्ञा आहे ती आनंदास जरूर असणारी एक उत्पादक गोष्ट होये.


 १ टेलर.