पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६५

टला.मागील आयुष्यक्रमांतल्या चुक्या, मूर्खपणा, अपराध ह्यांस शेवटच्या रामराम ठोकण्याची ही मोठी संधि असते. भावी आयुष्य आपल्यापुढें पसरलेलें असतें, त्यांत वरचढ कर - ण्यास नवीन आशा, नवीन शक्ति, व नवीन धैर्य मिळतें. गृह- सुख स्वर्गसुखासारखें आहे. घरांत नवराबायको, आईबाप, बहीणभावंडे, मुलेंबाळें, एकमेकांस आपापल्या रीतीनें निरनि- राळ्या कामधंद्यांत मदत करितात; असली मदत दुसऱ्या को- णासही करितां यावयाची नाहीं; कारण, इतरांस तसल्या संधि व एकमेकाची स्वभाव ओळख नसते. जीं आपल्या रक्तमांसाचीं त्याचें कल्याण, कीर्ति, सुस्वभाव, व चांगुलपणा ह्यांबद्दल जशी आपणांस कळकळ असते, तशी दुसऱ्या कोणासही नसते. त्यांस सुख झालें ह्मणजे आपणांस सुख होतें. त्यांस दुःख झालें ह्मणजे आपणांस वाईट वाटतें. त्यांच्या आपमतलबी वर्तनामुळे, किंवा गयाळपणामुळें अथवा नुस्त्या प्रापंचिक गोष्टीकडील लक्षामुळे आपणांस अधमपणा येतो. त्यांचें शुद्ध वर्तन, औदार्य, व दृढ निश्चय ह्यामुळें आपण उदात्त होतों, आपणांस कर्तव्यकर्माची आठवण होते; व स्वर्ग आणि ईश्वर यांच्याकडे लक्ष जातें."
 शेवटीं मुलें असणें हें मोठें जोखीम आहे तरी त्यांत सुख आहे. "एक चांगली आई शंभर मास्तरांच्या योग्यतेची असते" असें जी. हर्बर्ट ह्मणतो. देवानें दिलीं असें मुलांविषयीं कधीं कधीं ह्मणतात; व उधळपट्टी करणारी आईबापें, “देव जन्म देतो तेव्हां खाण्यास देण्याची तजवीज करीलच" असें ह्मणून आ- पल्यावरली जबाबदारी उडवून टाकितात. परंतु मॅथ्यू आरनल्ड ह्मणतो तें वाजवी आहे कीं, ज्यांना मुलांस योग्य रीतीनें ह्मणजे साधारण स्थितींत, अगदींच चिंचभात खाऊं न घालतां, पाळितां येत नाहीं त्यांना मुलें जन्मास आणण्याचा अधिकार नाहीं.