पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४

रहातातशी दिसतात. त्यांच्या सर्व आशा तृप्त झाल्यामुळें व एकमेकांवर प्रेम असल्यामुळे जेथे जेथें तीं जातात तेथें तेथें त्यांच्या पायांत मोहिनी भरलेली दिसते."
 जेरेमी टेलर ह्मणतो: “लग्न ही संस्था ईश्वरप्रणीत आहे. त्यामुळे झालेली ऐक्यता पवित्र आहे; त्यांचें अंतस्थ गुह्य कार-णही पवित्र आहे; लग्न हा शब्द प्रतिष्ठितपणाचा आहे; त्याचा उपयोग धार्मिक संस्कार असाच करितात. लग्न समाजास हि- तावह आहे, व ईश्वरदृष्टया पवित्रपणाचें आहे."
 टरटूलियन ह्मणतोः–“ लग्नानंतर जर सुख झालें तर त्याचें वर्णन करण्यास शब्द कसे सांपडावे ? दंपत्य जोडीनें ईश्वरभक्ति करितें, प्रार्थना करितें, एकत्र उपवास करितें, अडचणींच्या वेळीं संकटांच्या वेळी खाण्यापिण्याच्या वेळीं एकमेकांस सोबत असतें. परस्पर परस्परांपासून गुप्त ठेवित नाहीं, परस्पर परस्परांस ओ- झ्यासारखे वाटत नाहींत; अशी स्थिति पाहिली ह्मणजे ख्रिस्तास आनंद वाटतो; अशांस तो आपली शांति पाठवितो; जेथें दोन माणसें अशा रीतीनें एकत्र झालेलीं असतात त्या ठिकाणीं त्याचें वास्तव्य असतें; व ज्या ठिकाणीं ईश्वराचें वास्तव्य त्या ठिकाणी सैतानाचें नसतें. "
 लग्नविधींतील पवित्र व सुंदर वाक्याप्रमाणे “बऱ्यासाठीं व वाईटासाठीं, गरीबी असो व श्रीमंती असो, दुःखण्यापाण्याच्या वेळीं अथवा आरोग्याच्या वेळीं मृत्यु तुटातुट करीपर्यंत करण्याकरितां व आपली मानण्याकरितां आपण स्त्रीबरोबर लग्न लावितों.”

 स्टॅन्ली ह्मणतो- "चांगली बायको मिळाली ह्मणजे आयुष्याचा नवा आरंभ झाला. सौख्य व उपयुक्तता ह्यास नवीन अंकुर फु-


 १ केबल. २ मेरेज रिंग. ३ धर्मेचार्थेच कामेच नातिचरामि ।