पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६१

शेक्सपीयर ह्मणतो. कारण, “मित्रामित्रांत देवघेवीचा प्रकार झाला कीं, मित्रही नाहींसा होतो व पैसाही जातो." व वारंवार उसन- वारीनें पैसा काढिल्यामुळे काटकसर मंदावत जाते.” आणखी, सालोमन ह्मणतो- “जो परक्यासाठीं जामीन रहातो त्याला पद- रचें द्यावें लागतें. पण जो जामिनीचा तिटकारा करितो त्याचे पैसे सुरक्षित रहातात."
 मित्र तुमचें संकटांपासून रक्षण करितात व पुष्कळ दुःखें निवारितात. जेव्हां ऑगस्टसच्या मुलीनें ह्मणजे जुलियानें त्याच्या नावांस काळिमा आणिला तेव्हां तो ह्मणाला :- "मॅसनास किंवा अॅग्रिपा जिवंत असता तर हें झालें नसतें. "
 चांगले मित्र मिळाल्यावर त्यांस बाळगून ठेवा. “मैत्रीची पारख केल्यावर जे मित्र रहातील, ते आपल्या हृदयाशीं जणू लोखंडाच्या सांखळीने बांधून ठेवा.” त्यांना नाखूष होण्यास थोडें देखील कारण देऊ नका.
 मृत्यूनें जरी विभक्त झालो तरी स्वर्गात एकत्र भेटण्याची आशा असतेच. “प्रत्येक वर्षी जेव्हां मित्र एकामागून एक आड होत जातात, तेव्हां स्वर्गामध्ये आपल्या मित्रमंडळीचा समु- दाय किती वाढत चालला आहे ह्याचें विश्वासानें मनन केल्या- मुळे, मित्रांच्या मरणाच्या योगानें होणारा तोटा भरून निघत नाहीं, तथापि मनास आल्हाद होतो. "
 आयुष्यांतील अतिमहत्वाची गोष्ट ह्मणजे विवाह होय. अ- नुराग सृष्टपदार्थास मोहकता आणितो; सृष्टपदार्थात अनुरागच अनुराग दिसतो. त्यामुळे मृण्मय घुल्याचा आकाशांत भ्रमण करणारा पतंग बनतो; वसंतऋतूंत पक्ष्यांचे पिच्छ अनेक रंगांनीं खुलूं लागतात; काजव्याचा विद्युद्दीप चमकूं लागतो; पक्ष्यांत गायनबुद्धि जागृत होते; व काव्यांत प्रासादिक रसमाधुर्य येतें.