पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०

टणें बहुतेक ठरीव आहे. असें झाल्यास वृत्ति शांत ठेवा, व वि- चारानें वागा. आपल्या मित्रांच्या दृष्टीनें त्या तपासून पहा. घाईनें कांहीं करूं नका. सृष्टिनियमांत घाई नसते. “अतिघाई तेथें फार थोडी त्वरा" अशी जुनी ह्मण आहे. विशेष एवढें, वि- चार न करितां कोणांबरोबर भांडूं नका. बराच विचार करा; कांहीं वेळ थांबा. रात्रीं कांहीं गोष्टीमुळे डोकें संतापतें, पण त्याच दुसरे दिवशीं सकाळीं निराळ्या वाटू लागतात.
 खुबीदार, शेवटचें, पण मर्मभेदक पत्र लिहिलें असलें तर 'दुसऱ्या दिवसापर्यंत पाठवू नका; मग बहुतकरून तें तसेंच राहील; पोस्टांत पडणारच नाहीं. सर्वात उत्तम मित्र निवडून काढा; मुळींच मित्र नसण्यापेक्षां खराब मित्र असणें अधिक वा- ईट. “खलांच्या मार्गानें जाऊं नका; त्या मार्गाचा अव्हेर करा, त्याच्या वाज्यास जाऊं नका; मागें फिरा; दूर पळा. कारण, कां- हींना कांहीं वाईट केल्याशिवाय ते निजत नाहींत ; व कोणां- सही खड्डयांत उतरविल्याशिवाय त्यांना नीज येत नाहीं. पापा- चरण करून व अन्याय करून ते अन्नपाणी मिळवितात. परंतु स- त्यप्रिय लोकांचा मार्ग चकाकणाऱ्या प्रकाशाप्रमाणें आहे; तो दिवसें- दिवस पूर्ण सूर्याप्रमाणें प्रकाशत जातो. खलांशीं व मूर्खाशी मैत्री करणें चुकीचें आहे; तथापि त्यांच्याशीं शुत्रुत्व करणें हें शहाण- पणाचें नाहीं; कारण खल असंख्य आहेत."
 लॅब मार्मिकपणानें ह्मणतो: “जवळ असतात ते नकोसे होतात व नसतात ते हवे असतात." परंतु माया, धीरता, व सहृदयता ह्यामुळे अधिक फायदा होतो.
 आपणांस देता येईल तेवढे घेण्याचा मित्रांचा अधिकार आहे; पण, पैसे उसनवारीनें मागण्याचा त्यांस अधिकार नाहीं. “मि. त्रांस पैसे देऊंही नकोस व त्यांच्याकडून घेऊंही नकोस" असें