पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२

अचेतन सृष्टपदार्थांवरही तीच मोहिनी पडलेली दिसते. व पुष्पवर्ग सतेज रंगांनी गजबजलेला दिसतो.
 सायमोनायडीझ ह्मणतो :- “चांगली बायको असणें ह्या- सारखें दुसरें सुख नाहीं; व अवदशा बायको असण्यासारखी यमयातना नाहीं.” भरपावसाच्या दिवशी पाण्याची सारखी धार लागलेली अ- सणें, व कजाग बायको असणें ह्या गोष्टी सम आहेते. घराच्या कात्र्याच्या एका कोपऱ्यांत रहाणें बरें, पण राजवाड्यांत भांड- खोर बायकोबरोबर रहाणें नको'.
 बायकोची निवड करण्याच्या बाबतींत घेण्यासारखा उपदेश करणें सोपें काम नाहीं; तथापि कांहीं गोष्टी अवश्य विचार कर- ण्याजोग्या आहेत. अगदीं लवकर लग्न करणें बरें नाहीं. “अगदी लहानपणीं नवराबायकोचें लग्न झालें ह्मणजे वाटाण्याच्या ल- हानशा एका रोप्यास आधार ह्मणून जवळ दुसरा रोपा लावण्या- सारखें आहे" असें सर एच् टेलर हाणतो. पैशाकरितां लग्न करूं नका, पण जवळ पैसा असल्याशिवाय लग्न करूं नका. “जे पैशाकरितां लग्न करितात ते त्यापेक्षां आपली योग्यता कमी क रितात. कारण, संसारांतलें सुख व तृप्ति ह्यापेक्षां ते पैसा जास्त मौल्यवान् समजतात. आपलीं दुःखें व पैसा यांची तुलना करून पाहिल्यावर जें आयुष्य पैशाकरितां विकलें तें सर्व पैसा खर्ची घालून परत घेण्यास माणसें किती आनंदाने तयार होतील! "

 “लग्न केल्यावर मागचाच आयुष्यक्रम आपणांस ठेवितां ये- ईल; मात्र एक सुंदर, साधें, आनंदी, मोकळ्यामनाचें माणूस आपल्या आयुष्याचें बाह्यांग ह्मणून सांपडेल; एकटे बसण्याचा आणि आवश्यक कामाचा त्रास आला ह्मणजे करमणूक करील;


 १ प्राव्हर्ब्स. २ प्राव्हर्न्स. ३ जेरेमी टेलर मॅरेज रिंग.