पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५७

केली असती." रागावला असल्यास क्षणभर थांबा, व विचार केल्यावर बोला. मॅथ्यु आर्नल्ड उच्च शिक्षणसंस्काराचे अंगधर्म असे देतोः–“ त्यामुळे आपण रेलचेल गय करितों; परिस्थिती- कडे विशेष लक्ष पुरवितों; कर्माची फार कडक तपासणी करितों; पण तें कर्म करणाऱ्या मनुष्यावर दया करितों."
 मृत्यु सर्वोस एकाच पदावर आणणार; तर तें पहिल्या. नेंच उमजून गृहस्थास शोभेल साजेल अशा सभ्यपणानें इत रांस वागवा.
 मित्र रागावला असतां, किंवा त्याच्या मनांत तुमच्याविषयीं वांकडें आलें असतां, होता होईल तों त्याला सोडून जाऊं नका; तो शेवटचाच रामराम होण्याचा संभव आहे हें लक्षांत ठेवा. कांहीं शब्द सूर्याच्या किरणांप्रमाणें आल्हादकारक असतात; च कांहीं विषारी बाणांप्रमाणें किंवा सर्पदंशाप्रमाणे असतात. कठोर शब्दांनी इतके घाय पडतात, तर ममतेच्या शब्दानें किती सुख होईल बरें.
 जॉर्ज हर्बर्ट ह्मणतो :- “चांगले शब्द बोलावयास पदरचें द्यावें लागत नाहीं, पण त्यांची किंमत फार असते.”
 “कारण, शल्यतुल्य उद्गार रोखून उच्चारलेले नसले, तरी बोलणाऱ्याच्या स्वप्नीं नाहींत अशा माणसाला लागू पडतात. व उद्देश नसतां उच्चारलेले शब्द दुःखानें द्विधा झालेल्या हृदयास शांति देतात, अथवा अधिक टोंचतात." नेहमीं तोंडानें बोलून दाखविण्याची जरूरी नसते. जेव्हां पीटरने ख्रिस्ताचा माझा सं- बंध नाहीं असें ह्मटलें तेव्हां ख्रिस्तानें पीटरकडे नुस्तें पाहिलें, असें सांगतात. ती दुःखी झालेली व दोष सुचविणारी मुद्रा पुरे झाली. पीटर बाहेर गेला व ढळढळां रडला.
 मुद्रेच्या योगानें शल्याप्रमाणें टोंचणारें दुःख होतें हैं जसें
 १४