पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६

 “ एकोपा व भिन्नभाव ह्या कल्पना गायन शास्त्रांतल्या सुरैक्यता व बेसूरपणा ह्यापासून निघाल्या असें कधीं कधीं समजतात. पण त्यांत अधिक खोल अर्थ आहे; त्या मनामनाचें तादात्म्य किंवा पृथक्त्व ह्यावरून निघाल्या आहेत. "
 लोकांच्या चुक्या काढणेंच असल्या, तर निदान गोड श ब्दांनीं त्या सांगा. विशेषेकरून मुलांच्या; कारण, "मुलांचें पा- ळण्यातलें तें लहानसें जग मोठ्या माणसांच्या ताऱ्यांनीं भर- लेल्या आकाशापेक्षां लवकर शून्यवत् होतें." असें सांगतात कीं, रुबेन चित्रकारास ब्रशाच्या एका फेऱ्यानें मुलांचें हंसतमुख रडवें करितां येत असे. संसारांत सर्वोस तसें प्रत्यक्ष करितां येतें; सर्व उदाहरणांत एक शब्द देखील पुरा होतो.
 सौम्यपणें बोला, ती लहानच गोष्ट आहे. हृदयरूपी कूपांत टाकिलेली ती अगदी लहानशी वस्तु आहे; त्यापासून काय नि- ष्पन्न होईल व किती आनंद मिळेल तें शाश्वतीलाच सांगतां येतें.
 दोष देणें असेल तो खासगी रीतीनें द्यावा, व स्तुति करणें असेल ती सर्वोच्या समक्ष करावी; हा नियम देखील बरा आहे. खासगत रीतीनें सांगितलेलें जास्त खपेल, व बऱ्या बुद्धीनें सां- गितलें असें वाटेल; आणि त्यापासून खरोखर पुष्कळ फायदा होईल. तसेंच सर्वोच्या समक्ष स्तुती केल्यामुळे अंगांत जास्त हिंमत येते व ती जास्त किंमतीची वाटावयास लागते.

सर्वात विशेष, दोष देण्याचें कारण पडल्यास तो गंभीर मुद्रेनें द्या, व त्याबद्दल आपणांस वाईट वाटतें असें दाखवा. साधल्यास रागावूं नका अथवा त्रासलों असें दाखवूं नका. आर्कायटस आ- पल्या गुलामास ह्मणतोः–“मी रागावलों नसतों तर तुला शिक्षा


 १ सर ए. मॅक्सवेलची मेरिडियाना. २ जीन पॉल रिक्टर.
 ३ लँग फोर्ड.