पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८

खरें आहे, तसें ममताप्रदर्शक मुद्रेमुळे हृदय आनंदानें उचंबळू लागतें हेंही खरें आहे. फार वेळ एकमेकांस पाहिले नसलें, ह्म- णजे आपले मनःपूर्वक आगतस्वागत होईल अशी जी आपली खात्री असते तीमुळें आपला जीव कसा तुटत असतो ? सकाळीं जेव्हां गांठ पडते, तेव्हां आनंद व हासभरित मुद्रा पाहून अति- शय दुःखाचा दिवस देखील जड वाटत नाहीं.
 आंतल्या गांठीचे होऊ नका. आपली ममता दर्शविण्यास भिऊं नका. बाहेरून ममता दिसत नाहीं तर आंतली प्रीति पुरेशी नाहीं. प्रत्यक्ष मदत करण्यापेक्षां नुस्ती सहृदयता दाख- विल्यामुळे माणसास बरीच मदत होते. नुस्त्या पैशापेक्षां प्रीति जास्त आहे. बक्षिसापेक्षां नुस्त्या ममतेच्या शब्दानें जास्त आ- नंद होतो.
 तूं चितारी कसा झालास असें जेव्हां बेन्जामिन वेस्टला वि- चारिलें, तेव्हां "माझ्या आईच्या चुंबनानें" असें तो ह्मणाला. कन्फ्यूझस ह्मणतो – “घरची कर्तव्यें बरोबर केलीं, तर यज्ञयाग करण्यासाठीं दूर (तीर्थावर ) जावयास कशास हवें ?"
 मित्रांची निवड फार काळजीनें करा. “मित्र ह्मणजे संसा- राची फार किंमतीची व सुंदर सामुग्री होये" जॉर्ज हर्बर्ट - ह्मणजे तुह्मी त्यां-णतो- “चांगल्या लोकांच्या संगतींत असा, च्यापैकीं व्हाल. " स्पॅनिश भाषेतली एक ह्मण आहे - "कोणां- बरोबर तूं असतोस तें सांग, ह्मणजे तूं कोण आहेस तें मी सां- गतों.” जो स्वतःशीं चांगल्या रीतीनें वागत नाहीं तो दुसऱ्याशीं वागणार नाहीं.

 "उत्तम माणसांशी मैत्री हा सर्वात उदात्त गुण होय. त्या-


 १ सिसरो.