पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५२

व त्या पुलाच्या वरल्या अंगास देवळाचीं घुमटें आकाशास लागलेलीं दिसतात.”
 सृष्टिसौंदर्य अविनाशी सौख्य देतें; पण, मनांत आनंदाचा प्रकाश असल्याशिवाय आकाशांतील सूर्यप्रकाश कांहीं कामाचा नाहीं.
 कुटुंबासंबंधानें प्रेम, ममता व पूज्यबुद्धि वागविणें हें त्यांचें ऋण आपणांस देणें आहे. हाच सुधारणेचा मुख्य पाया; हीच उदात्त गोष्टी शिकविणारी शाळा; आपल्या उदात्त भावना व शुद्धि प्रकृति ह्यांमुळे जागृत होतात. इतरांस सुखी करण्यापली- कडे देवदूतांनीं दुसरें कोणतें काम करावें ?
 तुमचें घर लहानसें असो, तेथें रसिकता नसो, तेथें तुमच्या- वर प्रेम करणारें माणूस नसो, तें तुह्मांस आवडणारें नसो, पण तुमची जागा तेथें, तुमचें कर्तव्य त्या संबंधानें; व कर्तव्य बजा- वण्यांत जितक्या जास्त अडचणी तितकें बक्षिस जास्त.
 मेहनतीचें काम करण्यापेक्षां त्रास किंवा अन्याय सहन क- रणें हें अधिक कठीण आहे. तो मूर्तिमंत आत्मत्याग. पैसा दे - ण्यापेक्षा, आपला वेळ खर्ची घालण्यापेक्षां अथवा अपार श्रम करण्यापेक्षां तो कठीण होय.

 इतरांस दुःख द्यावें असें फार थोड्या लोकांस वाटतें. असे लोक मी लिहितों तें वाचतील असा संभव नाहीं. तथापि निर्द- यपणा करण्यापेक्षां बहुतकरून विचार नसल्यामुळें, अथवा काम करून घेण्याचें कसब नसल्यामुळें, पुष्कळ दुःख दिलें जातें हैं शक्य आहे. हंसतमुखानें लोकांचें आगतस्वागत करा, व त्यांच्याशी गोड बोला. जे आपणांस आवडतात त्यांच्यावर म- नांत प्रीति करून चालत नाहीं, आपण प्रीति करितों असें त्यांस


 १ "माळ्याची मुलगी" नांवाचें टेनिसनचें काव्य.