पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५३

दाखविलें पाहिजे. ज्यांच्यावर आपलें अतिशय प्रेम असतें, व ज्यांस मदत करण्याची आपली फार फार इच्छा असते अशा लोकांस अजाणतेपणानें, अविचारीपणानें अथवा सारासार विचार नसल्यामुळे आपण दुःखवितों.
 धीर देणारे दोन शब्द ऐकून किती हिंमत व उत्तेजन येतें, हें सर्वोस माहीत आहेच. चेस्टरफील्ड ह्मणतो :- “ इतरांवर प्रेम कसे ठेवावें, व द्वेष कसा करावा ह्या दोन गोष्टींबद्दल लोकांस जेवढी कमी माहिती असेल, तेवढी फार थोड्या गोष्टींबद्दल असते, असे मला इतके दिवस वाटत होतें, व हल्लींही वाटतें. चुकीनें फार लाड करून, डोळेझांक करून, अथवा दुर्गुणांकडे कानाडोळा करून ज्यांच्यावर आपलें प्रेम अशा लोकांचें आपण नुकसान करितों; भलत्याच वेळीं राग दाखवून व आपली द्वेष- बुद्धि प्रगट करून आपण आपला तोटा करून घेतों."
 संसारांत मित्र असूनही एकलकोंडे होण्याचा कल असतो. “ज्याप्रमाणें निरनिराळ्या बेटांवर रहात असावें, त्याप्रमाणें ह्या अस्थिपंजराच्या तुरुंगांत व चर्मरूपी पडद्यांत सांपडून आपण एकमेकांपासून भिन्न झालों आहोत."
 आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस व मित्रांस आपण कितीसे ओ- ळखतों? वारंवार एकाच कुटुंबांतील माणसांचा अर्थाअर्थी संबंध नसतो; त्यांची मनें जणू समांतर रेषेनें जात असतात, व कधीं एकत्र मिळत नाहींत, त्यांचें एकमेकांशीं मतैक्य नसतें.

 “आपल्या अगदीं रक्तामांसाच्या अतिशय ममताळू माणसास देखील आपणांस सुख कां झालें व दुःख कां झालें त्याचीं अध कारणें कळत नाहींते. "


 १ जीन पॉल रिक्टर. २ केवल.