पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देह सोडून जाण्यास तयार आहेस, त्या तुझ्या शरीराचा तो ईश्वरी अंश रक्षक होवो.”
 सार्वजनिक कामांकडे जो वेळ लावितो तो निव्वळ स्वार्थत्याग नव्हे. त्याचें फळ मिळतेंच. "बरें करण्यापासून जें अतिशय सुख होतें तें मिळविण्यास आपण शिकतों. १"
 "आणीबाणीच्या प्रसंगीं कांहीं प्रमाणानें सार्वजनिक हिता- हित तेंच खुद्दाचें हिताहित मानणें ही फार महत्वाची गोष्ट आहे. २"
 कांहीं लोक त्रास देतात, व कांहीं घेतात. वाटलें तर, प्रत्ये- कास शूर व स्वदेशाभिमानी होतां येईल; व आपल्या देशबां- धवांच्या हिताच्या कोणत्या तरी चळवळीस प्रत्येकास थोडी मदत करितां येईल; व त्यांना अधिक आनंदी, अधिक निरोगी, व अधिक चांगल्या रीतीनें राहण्यास मदत करितां येईल; आणि असें केल्यावरच केव्हांना केव्हां तरी स्वतःस विचारावा लागणाऱ्या पुढील प्रश्नास समर्पक उत्तर तुह्मांस देतां येईल. तो प्रश्न हाः-

 “सत्यासाठीं व न्यायासाठीं, माणसांसाठीं व देवासाठीं, तर- तरीत तारुण्याच्या सुखाच्या वेळापासून तों आयुष्याच्या उतार वयापर्यंत तुह्मीं काय केलें ?”


 १ गोल्डस्मिथ. २ हार्सफॉल.